शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीसंदर्भात आज मुंबईत निर्णय

By admin | Updated: May 18, 2015 00:15 IST

स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) फरकाची रक्कम माफ करावी, यासाठी सोमवारी १८ मे रोजी मुंबई येथे मंत्रालयात ...

राज्यमंत्र्यांची बैठक : व्यापारी मांडणार कैफियतअमरावती : स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) फरकाची रक्कम माफ करावी, यासाठी सोमवारी १८ मे रोजी मुंबई येथे मंत्रालयात अतिशय महत्त्वाची बैठक होऊ घातली आहे. ही बैठक नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील घेणार असून जिल्ह्यातील व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला हजर राहतील.चेम्बर आॅफ अमरावती महानगर मर्चन्टस् अ‍ॅन्ड इंडस्ट्रिजने एलबीटी फरकाच्या रकमेच्या माफीसाठी मुख्यमंत्री, नगरविकास राज्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी आदींकडे सतत पाठपुरावा केला. मात्र, महापालिका प्रशासनाने एलबीटी फरकाची रक्कम २१ महिन्यांच्या कालावधीत भरण्यासाठी व्यावसायिकांना नोटीस बजावल्या आहेत. कर मूल्यनिर्धारण करताना व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचत असताना कोणीही त्यांची मदत करीत नसल्याची भावना व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, आयुक्त गुडेवार यांनी एलबीटीची रक्कम वेळेत अदा न केल्यास दंड वसूल केली जाईल, अशी ताकिद दिल्याने व्यावसायिक चक्रावून गेले आहेत. परिणामी नगरविकास राज्यमंत्र्यांसमोर येथील व्यावसायिकांनी हा बिकट मुद्दा उपस्थित केला असता यासंदर्भात मुंबईत बैठक घऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार सोमवारी ही बैठक होणार आहे. बैठकीत पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, आ. रवी राणा, किरण पातुरकर, तुषार भारतीय, संजय अग्रवाल, सुरेश जैन, घनश्याम राठी, विजय जाधव हजर राहतील. (प्रतिनिधी)