शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्याच्या नादात विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: September 24, 2014 23:23 IST

गोंविदनगरलगतच्या एका वाडीतील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. विक्की किशन सुतके (१६, रा. शिवाजीनगर) असे, मृताचे नाव आहे.

अमरावती : गोंविदनगरलगतच्या एका वाडीतील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. विक्की किशन सुतके (१६, रा. शिवाजीनगर) असे, मृताचे नाव आहे. चार वर्षांमध्ये याच विहिरीने चार जणांचे बळी घेतले आहे. त्यामुळे विहीर बुजविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शिवाजीनगरातील रहिवासी मृत विक्की सुतके हा सरोज कॉलनीतील बाबूराव कुबेटकर विद्यालयात इयत्ता १० वीत शिकत होता. विक्कीचे आई-वडील हातमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. विक्कीला एक मोठा भाऊ असून तो मजुरीचे काम करतो. मंगळवारी दुपारी ३ वाजता दरम्यान विक्की दोन मित्रांसह गोंविदनगराच्या मागील परिसरात असलेल्या जाधव यांच्या वाडीतील विहिरीत पोहण्याकरिता गेला हवेची उशी सोबत नेली होती. तिघांनी विहिरीत उडी घेतली. काही वेळाने दोघे बाहेर आले; मात्र विक्की बाहेर आलाच नाही. हे लक्षात येताच त्याचे मित्र विक्कीचा शोध घेऊ लागले व तत्काळ धाव घेऊन घटनेची माहिती विक्क ीच्या कुटुंबीयांना दिली. राजापेठ पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक एस. एस. भगत यांच्या नेत्तृत्वात उदयराज मिश्रा व युवराज यादव यांनी घटनास्थळ गाठले. सहायक पोलीस आयुक्त कळमकर यांनीही घटनास्थळाला भेट देऊन घटनेची चौकशी केली. पोलिसांनी या घटनेची सूचना अग्निशमन विभागाला देऊन त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. रात्री १०.३० वाजेपर्यंत पोलीस, अग्निशमक व नागरिकांच्या मदतीने मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह गाळात फसल्यामुळे अंधारात अग्निशमन दलास मृतदेह काढण्यात यश मिळाले नाही. बुधवारी सकाळी पुन्हा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांंनी प्रयत्न सुरु केले. सकाळी ११.३० वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे शिवाजी नगरात शोककळा पसरली आहे. राजापेठ पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून मर्ग दाखल केला आहे. (प्रतिनिधी)