शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मृत मांजराचे दूषित पाणी गुरांना !

By admin | Updated: October 24, 2015 00:14 IST

बडनेऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुरांच्या बाजार परिसरातील विहिरीत कित्येक दिवसांपासून मांजर पडून सडली आहे.

तीव्र रोष : बाजार समितीचे दुर्लक्ष, गंभीर संक्रमणाचा धोकाश्यामकांत सहस्त्रभोजने  बडनेराबडनेऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुरांच्या बाजार परिसरातील विहिरीत कित्येक दिवसांपासून मांजर पडून सडली आहे. यामुळे पाण्यात अळ्या झाल्या आहेत. हे पाणी बाजारातील जनावरांना पिण्यासाठी सोडले जाते. बाजार समिती प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे जिवीत हानीला निमंत्रण मिळत आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत दर शुक्रवारी बडनेऱ्यात गुरांचा बाजार भरतो. बाजाराचा मोठा परिसर आहे. या बाजारात महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, पंजाब, बिहार आदी राज्यांतून म्हशी विक्रीसाठी येतात. या बाजारात शुक्रवारी मोठी उलाढाल होत असते. बाजाराच्या दिवशी येथे प्रचंड गर्दी असते. मात्र याकडे बाजार समिती प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. बाजार परिसरात विहीर आहे. या विहिरीवर मोटपंप आहे. थोड्याच अंतरावर एक टाके आहे. विहिरीतील पाणी जनावरांना पिण्यासाठी टाक्यात सोडले जाते. बऱ्याच दिवसांपासून या विहिरीत एक मांजर मृत अवस्थेत पडले आहे. हे मांजर पाण्यामुळे सडली आहे. त्याच्या भोवताल पाण्यातच शेकडो किडे, अळ्या तयार झाले आहेत. हेच पाणी जनावरांसाठी वापरण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर परिसरातील हॉटेलचालक व खरेदी व विक्रीदारदेखील वापरत होते. ज्यांना विहिरीत मांजर पडल्याची माहिती होती त्यांनी या पाण्याचा वापर टाळला. मात्र जनावरांना हे पाणी पाजण्यात येत आहे. बाजार समितीच्या दुर्लक्षितपणावर तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. विहिरीत मांजर पडल्याची माहिती बाजारात येणाऱ्यांनी व्यवस्थापकास दिल्याचे बोलले जात होते. आरोग्याची हानी टाळण्यासाठी हॉटेलचालकांनी बाहेरुन पाणी बोलावले होते. जनावरांना या घाणेरड्या पाण्यापासून इजा पोहोचल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न याठिकाणी उपस्थित केला जात आहे. बाजार समिती पावत्या फाडण्यासाठी आहे का?गुरांच्या बाजारातील विहिरीत बऱ्याच दिवसांपासून मृत मांजर सडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे विहिरीत शेकडो अळ्या झाल्या आहेत. दूरदूरुन येणाऱ्या जनावरांना पाणी कसे पाजायचे? बाजार समिती केवळ पावत्या फाडण्यासाठीच आहे का, असा प्रश्न याठिकाणी उपस्थित केला आहे. बाजारात आवश्यक त्या बाबींकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष पुरविणेदेखील गरजेचे आहे. विहिरीत मृत मांजर असल्याची माहिती गुरुवारी रात्री मिळाली. मांजरीला शुक्रवारी बाहेर काढण्यात आले. पाणी स्वच्छ करणाऱ्या उपाययोना केल्या आहेत. यानंतर विहिरीला पक्के झाकण बसविले जाईल. बाजार समिती याकडे लक्ष ठेवून आहे. हे पाणी केवळ जनावरे धुण्यासाठीच वापरले जाते, पिण्यासाठी नाही.- आर.पी. वानखडे,विभाग प्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार पेठ, बडनेरा.