दर्यापूर तालुका दोन मोठ्या ग्रामपंचायती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:14 IST2021-01-20T04:14:46+5:302021-01-20T04:14:46+5:30

दर्यापूर : तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या वडनेर गंगाई येथे सहा प्रभागांतील एकूण १७ जागांपैकी समता पॅनलने ...

Daryapur taluka has two large gram panchayats | दर्यापूर तालुका दोन मोठ्या ग्रामपंचायती

दर्यापूर तालुका दोन मोठ्या ग्रामपंचायती

दर्यापूर : तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या वडनेर गंगाई येथे सहा प्रभागांतील एकूण १७ जागांपैकी समता पॅनलने नऊ जागा जिंकल्या, तर ग्रामविकास पॅनलचे आठ उमेदवार विजयी झाले. समता पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये प्रकाश अंजनकार, मोहिनी हुतके, शालीकाराम कोल्हे, प्रकाश कानकिरळ, लता कात्रे, गोकर्णा इंगळे, किरण लाजूरकर, दुर्गा लाखे, रमेश श्रीकृष्ण चव्हाण यांचा समावेश आहे, तर ग्रामविकास पॅनलच्या आठ विजयी उमेदवारांमध्ये शाहीउल्ला खान अब्दुल्ला खान, पुष्पा देशमुख, मीना रेठे, सागर देशमुख, अन्नपूर्णा वानखडे, ललिता कोथळकर, दिनकर देशमुख, शालिनी वानखडे यांचा समावेश आहे.

-------------------

दर्यापूर :

येवदा ग्रामपंचायतीमध्ये गड आला; पण सिंह गेला

येवदा : स्थानिक १७ सदस्यीय ग्रामपंचायतीवर बाळासाहेब राऊत यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास पॅनलने ११ सदस्य निवडून आणून वर्चस्व प्रस्थापित केले. प्रतिस्पर्धी प्रदीप देशमुख यांच्या समता पॅनलचे पाच उमेदवार निवडून आले, तर प्रहारच्या जनशक्ती विकास आघाडीचा एक उमेदवार निवडून आला. पॅनल प्रमुख बाळासाहेब राऊत पडले. सुयोग टोबर, इंदू ठाकरे, देवीदास कोकाटे, अमानुल्ला खा, अनिता तिडके, रंजीत सोळुंके, जदा नर्गिस मो. नाशिर, राजेश गणोरकर, मोहम्मद मुजम्मिल जमादार, अंजली कैकाडी, प्रतिभा मोहोड, शारदा लहाने, अनुराधा करुले, प्रदीप देशमुख, मुरलीधर बगाडे, सविता धारपवार, वैशाली मोहोड हे विजयी झाले.

Web Title: Daryapur taluka has two large gram panchayats