शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
3
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
4
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
5
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
6
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
7
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
8
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
9
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
10
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
11
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
12
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
13
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
14
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
15
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
16
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
17
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
18
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
19
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
20
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
Daily Top 2Weekly Top 5

डफरीनमध्ये दिवसाकाठी एका बाळाचा मृत्यू !

By admin | Updated: May 20, 2014 23:22 IST

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) दर महिन्यात ७०० ते ८०० महिलांची प्रसूती केली जाते. त्यात दर दिवसाला सरासरी एका बाळांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे

 १८३३ प्रसूती : एप्रिल महिन्यात ४४ बाळांचा मृत्यू

वैभव बाबरेकर - अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) दर महिन्यात ७०० ते ८०० महिलांची प्रसूती केली जाते. त्यात दर दिवसाला सरासरी एका बाळांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोटातील गोळ्याचा नऊ महिने सांभाळ केल्यानंतर प्रसूती दरम्यान त्या मातेसमोर तिच्या बाळाचा मृत्यू होत असेल तर ही बाब अत्यंत वेदना देणारी ठरते. जिल्हा स्त्री रुग्णालयात दर दिवसाला सरासरी एका मातेवर हा दु:खद प्रसंग ओढवत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून गोरगरीब महिला प्रसूतीचा उपचाराकरिता जिल्हा स्त्री रुग्णालयात मोठ्या आशेने येतात. त्यापैकी काही महिलांच्या हाती निराशा येत असल्याचे निर्देशनास येत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात दररोज शेकडो महिलांना प्रसूतीकरिता दाखल केल्यावर त्यापैकी १० ते १५ महिलांची दररोज प्रसूती केली जात आहे. १ जानेवारी २०१४ ते एप्रिल महिन्यापर्यंत रुग्णालयात ३ हजार २१२ महिलांची प्रसूती करण्यात आले आहे. यामध्ये १६६५ मुले व १४९३ मुली जन्माला आल्या आहेत. मात्र यामध्ये ३ हजार २१२ प्रसूत महिलांपैकी १२४ महिलांचे बाळ दगावले आहेत. या रुग्णालयात रुग्णांना योग्य उपचाराची सुविधा नसल्याची ओरड नेहमीच होत असते. रुग्णालयीन परिसरात अस्वच्छता तसेच रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांची अपुरी संख्या यामुळे रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार मिळत नसल्याचे दिसून येते. अश्या प्रकारामुळेच बाळ दगावण्याच्या घटनाही वाढत असल्याचे निर्देशनास येत आहे.