शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

सामदा येथील बांध फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

पुलाखालून जाणारे पाणी रोखल्या गेल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पावसाळ्याच्या तोंडावर नवीन पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, जुना बांध मोकळा न केल्याने ३० जून रोजी आलेल्या दमदार पावसामुळे गयाटीचा नाला तुडूंब भरून वाहिला आणि पुलाजवळ पाणी अडल्यामुळे सौंदळी परिसरात हा बांध फुटला. त्यामुळे सौंदळी-तोंगलाबाद परिसरातील १०० एकरांपेक्षा अधिक शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.

ठळक मुद्देशेती खरडली : नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : दर्यापूर ते अकोला राज्य महामार्गावर लासूर ते तोंगलाबाद गावच्या मधातील गयाटी नाल्यावरील बांध फुटल्याने शेकडो हेक्टर शेती खरडून गेली. त्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्या पुलाचे बांधकाम अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पुलाच्या बाजूला रस्ता करण्यात आला.पुलाखालून जाणारे पाणी रोखल्या गेल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पावसाळ्याच्या तोंडावर नवीन पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, जुना बांध मोकळा न केल्याने ३० जून रोजी आलेल्या दमदार पावसामुळे गयाटीचा नाला तुडूंब भरून वाहिला आणि पुलाजवळ पाणी अडल्यामुळे सौंदळी परिसरात हा बांध फुटला. त्यामुळे सौंदळी-तोंगलाबाद परिसरातील १०० एकरांपेक्षा अधिक शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे आधीच कोरोना व दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यात नाल्याच्या पुराने शेती खरडल्याने ते हतबल झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सौंदळीचे सरपंच भारती देशमुख, तलाठी ब्राह्मणकर, तोंगलाबादचे पोलीस पाटील ललिता काळे यांनी त्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी शेतकरी अत्यंत आक्रमक होऊन नुकसानभरपाईची मागणी करत होते.पुलाचे बांधकाम करण्यासाठी नाल्याला बांध घेण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास नुकसान होईल, हे कंपनीला लेखी कळविले.. मात्र दुर्लक्ष केल्यामुळे आमच्या जमिनी पाण्याखाली गेल्या.- वसंतराव तळोकर, शेतकरी, तोंगलाबाद

टॅग्स :Damधरण