शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
2
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
3
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
5
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
6
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
7
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
8
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
9
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
10
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
11
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
12
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
13
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
14
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
15
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
16
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
17
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
18
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
19
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
20
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत ‘पतिराज’ची दबंगगिरी

By admin | Updated: December 18, 2014 00:08 IST

महापालिकेत महिला नगरसेविकांच्या यजमानांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबंगगिरीने न होणारी कामे करावयास भाग पाडणे ही नित्याचीच बाब आहे.

अमरावती : महापालिकेत महिला नगरसेविकांच्या यजमानांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबंगगिरीने न होणारी कामे करावयास भाग पाडणे ही नित्याचीच बाब आहे. मात्र बुधवारी एका ‘पतिराज’ ने परिसीमा ओलांडत चक्क कार्यकारी अभियंत्यावर रुबाब जमविण्यासाठी घरी असलेल्या नगसेविका पत्नीला महापालिकेत बोलावले. या नगरसेविकेने सत्यता न बघता पतीची बाजू घेतली. अस्सल इंग्रजीत शब्दप्रयोग करुन आपण काहीतरी वेगळे आहोत, अशी ‘स्टाईल’ मारली. परंतु ‘पतीराज’ ला प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करता येत नाही, याची जाणीव करुन देण्याचे या नगरसेविकेने सौजन्य दाखविले नाही, हे विशेष.
महापालिकेत कोणत्या ना कोणत्या कारणाने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधीकडून एकेरी भाषेचा शब्दप्रयोग करणे, हे काही नवीन नाही. परंतु कर्त्या अधिकाऱ्यांवर ठोस कारण नसताना चक्क शिविगाळ करेपर्यत पोहचणे हे संयुक्तिक नाही.
लोकप्रतिनिधींना बरेच अधिकार आहेत. सभागृहात प्रस्ताव किंवा विषय मांडून एखाद्या प्रकरणाची माहिती मागून त्या अधिकाऱ्यांची कोंडी सहजतेने करता येते. मात्र महापालिकेत व्यक्तीगत हिताला अधिक प्राधान्य दिले जात असल्यामुळे अधिकारीवर्ग त्रस्त झाला आहे. विकासकामांच्या बाबत कानउघाडणी केली तर ऐकून घेण्यास हरकत नाही. मात्र नगरसेवकांचे वैयक्तिक ‘प्रश्न’ कसे सोडवावे, या समस्येने अधिकारी त्रस्त आहेत. अशाच विषयातूनच कार्यकारी अभियंता आणि नगरसेविका, पतिराज यांच्यात सभागृहात हजर न राहण्याच्या विषयावरुन वाद झाल्याची चर्चा महापालिकेत ऐकावयास मिळाली. या महिला नगरसेविकाच्या स्वभावाने बहुतांश अधिकारी त्रस्त आहेत. वर्षभरापूर्वी झोन कार्यालयातील सभेत ‘आय वॉन्ट टू रिझल्ट’ अशा वारंवार शब्दप्रयोगाने ही नगरसेविका चांगलीच चर्चेत आली होती. बुधवारी तर या नगरसेविकेने पतीच्या मदतीला धावून जाण्याच्या नांदात आपण स्वत: अडचणीत येणार असल्याचा विसर देखील त्यांना पडला. विनाकारण कार्यकारी अभियंत्याला ऐकेरी भाषेचा शब्दप्रयोग या नगरसेविकेने केल्याप्रकरणी ही बाब प्रशासकीय कार्यवाहीच्या कक्षात मोडणारी आहे, याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवणे गरजेचे आहे.
महिला नगरसेविकांनी स्वत:ची प्रशासकीय कामे स्वत: हाताळावी असे काही महिन्यापूर्वी आयुक्तांनी पत्रवजा नियमावलीचे आदेश निर्गमित केले होते. असे असताना पतीराजच मोठ्या प्रमाणात प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)