शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
2
Top Marathi News Live Updates: मंत्री नितेश राणे पायी चालत कॅबिनेट बैठकीसाठी हजर, इंधन बचतीचा नवा आदर्श
3
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
4
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
5
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
6
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
7
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
8
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
9
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
10
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
11
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
12
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
13
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
14
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
15
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
16
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
17
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
18
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
19
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
20
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दत्तापुरात सिलिंडरचा स्फोट

By admin | Updated: May 15, 2014 23:04 IST

दुपारी घरात स्वयंपाक तयार करीत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला आणि घरातील सर्वच संसारउपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली.

अमरावती : दुपारी घरात स्वयंपाक तयार करीत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला आणि घरातील सर्वच संसारउपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली. दैव बलवत्तर म्हणून दाम्पत्याचे प्राण वाचले. ही घटना गुरुवारी दुपारी जुना दत्तापूर शहरात घडली.

धामणगाव शहराच्या दक्षिण भागात दत्तापूर परिसरात संदीप यादव यांचे घर आहे. त्यांची पत्नी दुपारी बारा वाजता घरी स्वयंपाक करीत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. घरात असलेले गहू, तांदूळ, संसारउपयोगी साहित्याची पूर्णत: राखरांगोळी झाली. घरातील टीव्ही, लोखंडी कपाटातील कपडे, पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आगीत वितळले. हातावर आणून पानावर खाणार्‍या या गरीब कुटुंबाने आलमारीत दहा हजार रूपये ठेवले होते. ही रक्कम या आगीत पूर्ण जळून गेली. अंगावरील कपड्यांशिवाय या कुटुंबाजवळ काहीच शिल्लक राहिले नाहीत. सिलिंडरच्या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिक भयभीत झाले. घरात आगीचा भडका दिसताच या दाम्पत्याने आपले प्राण वाचवीत बाहेर आलेत. घटनेची माहिती बाजार समितीचे सभापती श्रीकांत गावंडे व न.प.सदस्य चंदू डहाणे यांनी नगर परिषदेच्या अग्नीशमन विभागाला दिली.

अग्नीशमन विभागाचे प्रमुख अशोक पाठक, नंदू हांडे, हेमंत कापसे यांनी आग विझविण्यात यश मिळविले. घरातील सर्वच साहित्य जळले व गरीब कुटूंब असल्याने प्रशासनाने त्वरित या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी श्रीकांत गावंडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)