शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रम अपूर्ण, दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

अमरावती : ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासक्रमाचे कमी झालेले आकलन, अजून ३० टक्के शिल्लक असलेला अभ्यासक्रम, सराव आणि उजळणीला मिळत असलेल्या ...

अमरावती : ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासक्रमाचे कमी झालेले आकलन, अजून ३० टक्के शिल्लक असलेला अभ्यासक्रम, सराव आणि उजळणीला मिळत असलेल्या कमी कालावधीमुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांत परीक्षांविषयी ताण वाढला आहे. करिअरच्या दृष्टीने दहावी, बारावीचे गुण महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंता वाढली आहे. आणखी २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

कोरोनामुळे दहावी, बारावीचे ऑनलाईन वर्ग जूनपासून सुरू झाले आहे. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरपासून ऑफलाईन वर्ग सुरू भरू लागले. त्यावेळी ऑनलाईन शिक्षणातून बहुतांश संकल्पना समजत नसल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले. त्यानुसार विद्यार्थी हितासाठी अनेक शाळांनी पहिल्यापासून शिकवण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमापैकी आतापर्यंत ४५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. एक दिवस आड भरणारे वर्ग, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जादा तास घेण्यातील अडचणीमुळे उर्वरित ३० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे शाळांना अडचणींचे ठरणारे आहे.

-------------------

ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अधिकतर अभ्यासक्रम नीट समजलेला नाही. विद्यार्थी हित लक्षात घेऊन ५० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घ्यावी.

- राजकन्या चवरे, पालक.

-----------------

विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण वाढत असल्याचे वास्तव आहे. ताे कमी करण्यासाठी अभ्यासक्रम आणखी कमी करावा. तामिळनाडुप्रमाणे शाळास्तरावर परीक्षा घेण्याचा विचार करावा.

- प्रकाश पाटील, पालक

-------------

ऑनलाईन शिक्षणामुळे वर्गातील प्रत्यक्ष संकल्पना विद्यार्थ्यांना समजल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षांचा ताण आला आहे. यंदा प्रश्नपत्रिकेची काठीण्यपातळी थोडी कमी करावी. उताऱ्यातील प्रश्नांची संख्या वाढवावी.

- चुटकी रोकडे, दहावी.

----------------

संभ्रम दूर व्हावा

शासनाने दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या स्वरुपाबाबत संभ्रम आहे. वर्णनात्मक की एमसीक्यू (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) स्वरूप असणार हे लवकर स्पष्ट व्हावे.

----------------

अमरावती विभागातील विद्यार्थी संख्या

दहावी : १६४६३२

बारावी : १३७५६९