शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात मूल्यांकनासाठी परीक्षकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा आटोपल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्याची नियमावली आहे. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयात समन्वयाचा अभाव असल्याने गत तीन ते चार वर्षांपासून ऑनलाइन, ऑफलाइन निकालाची बोंबाबोंब कायम आहे. हल्ली हिवाळी परीक्षेत ऑनलाइन कामकाजाला तूर्तास फाटा देण्यात आला आहे. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीमुळे हिवाळी २०१९ परीक्षांमध्ये फेररचना करण्यात आली.

ठळक मुद्देदंडात्मक कारवाईचा परिणाम : परीक्षा विभागात मूल्यांकनाला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मूल्यांकनासाठी परीक्षकांनी एकच गर्दी केली आहे. परीक्षा विभागात शुक्रवारी मूल्यांकनासाठी ३०० पेक्षा अधिक परीक्षकांनी हजेरी नोंदविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एरवी परीक्षकांना मूल्यांकनासाठी पाठवा, अशी विनंती परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकांना बरेचदा करावी लागतोे. मात्र, उन्हाळी २०१९ परीक्षेत मूल्यांकनासाठी टाळाटाळ करणाऱ्या परीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने ही गर्दी होत असल्याचे वास्तव आहे.सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा आटोपल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्याची नियमावली आहे. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयात समन्वयाचा अभाव असल्याने गत तीन ते चार वर्षांपासून आॅनलाइन, आॅफलाइन निकालाची बोंबाबोंब कायम आहे. हल्ली हिवाळी परीक्षेत ऑनलाइन कामकाजाला तूर्तास फाटा देण्यात आला आहे. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीमुळे हिवाळी २०१९ परीक्षांमध्ये फेररचना करण्यात आली. ३१ ऑक्टोबरपासून बॅकलॉग विषयाच्या परीक्षांना प्रारंभ झाला असून, १४ नोव्हेंबरपासून नियमित परीक्षा सुरू झाल्या आहेत. विद्यापीठ अंतर्गत १५२ महाविद्यालयातील केंद्रावर परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा आणि मूल्यांकन एकाच वेळी सुरू करण्यात आले आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशानुसार मूल्यांकनासाठी नियोजित वेळेत परीक्षकांनी हजर राहावे, यासाठी प्राचार्य, विषय प्राध्यापकांना ई-मेलद्वारे कळविण्यात आले आहे. मूल्यांकनासाठीचे पत्रसुद्धा पाठविण्यात आले आहे. त्यामुळे ५ नोव्हेंबरपासून मूल्यांकनास प्रारंभ झाले आहे. मध्यंतरी दिवाळी सुट्यांमुळे मूल्यांकनासाठी परीक्षकांची हजेरी अत्यल्प होती. आता ही गर्दी वाढू लागली आहे. परीक्षा विभागात मूल्यांकनासाठी जागा कमी पडत असल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांत परीक्षकांची संख्या वाढणार आहे. मात्र, हा बदल परीक्षकांवर दंडात्मक कारवाई आणि सेवापुस्तिकेत नोंद यामुळे झाल्याची चर्चा जोरात आहे.मूल्यांकनासाठी परीक्षकांनी वेळेत हजर राहावे, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. प्राचार्यासोबत संवाद आणि परीक्षकांना पत्र पाठविण्यात आले आहे. मेलद्वारे नियुक्ती आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे यंदा परीक्षकांची मूल्यांकनासाठी गर्दी वाढत आहे. निर्धारित कालावधीत मूल्यांकन होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ

टॅग्स :universityविद्यापीठ