शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियमावलीचे पालन न केल्यास फौजदारी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 05:01 IST

होम आयसोलेशन तसेच खासगी दवाखाने, शासकीय रुग्णालयांनी लक्षणे असलेले व लक्षणे नसलेले रुग्ण गृह विलगीकरणामध्ये ठेवत असताना  मोबाईल क्रमांक, पत्ता घेणे व रुग्णांची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. त्यांना घराबाहेर न निघणे, मास्क वापरणे, नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आदी  सूचना देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी केले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, पॉझिटिव्ह रुग्णांची नोंदणी आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मास्कचा वापर व दक्षतेबाबत जोरदार मोहीम हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  नवाल यांनी महापालिका व आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार जनजागृतीसाठी सोमवारपासून मोहीम राबविण्यात येणार आहे. होम आयसोलेशन तसेच खासगी दवाखाने, शासकीय रुग्णालयांनी लक्षणे असलेले व लक्षणे नसलेले रुग्ण गृह विलगीकरणामध्ये ठेवत असताना  मोबाईल क्रमांक, पत्ता घेणे व रुग्णांची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. त्यांना घराबाहेर न निघणे, मास्क वापरणे, नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आदी  सूचना देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी केले आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांचे नोंदणी ‘होमआयसोलेशन अमरावती’ या संकेत स्थळावर करावी. हे संकेत स्थळ मोबाईल द्वारे नियंत्रित करता येते, होम  आयसोलेशनमधील रुग्ण, गृह विलगीकरणाचे नियम पाळत नसल्यास रुग्णांविरुद्ध रोग प्रसार व नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल तसेच रुग्णांनी स्वत:पासून इतरांना कोरोनाची लागण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 

डॉक्टरांचे संपर्क क्रमांक बंधनकारकसर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची संपूर्ण नोंदणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून रुग्ण कुठे आहे, याची माहिती होईल. ७०३०९२२८५१, ७०३०९२२८५१ मोबाईल क्रमांकांवर नोंदणी करू शकणार आहे. रुग्णांचे मोबाईल क्रमांक घेणे आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णांशी व्हिडिओ कॉल, फोन कॉल करणे शक्य होईल, असे आवाहनही करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी टोचून घेतली लसजिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी पीडीएमसीला भेट देऊन पाहणी केली व स्वत: कक्षात जाऊन नोंदणी केल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेतून जात लस घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आल्याचे डॉ. नांदूरकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcollectorजिल्हाधिकारी