शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

-आता महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे समुपदेशन

By admin | Updated: October 8, 2015 00:13 IST

गुलाबबाबा नगरातील अकलेश मोहोडने महापालिका शाळा क्रमांक १७ च्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली.

अलकेशच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे : स्वच्छतेबाबतही विशेष सूचनाअमरावती : गुलाबबाबा नगरातील अकलेश मोहोडने महापालिका शाळा क्रमांक १७ च्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर महापालिका प्रशासन विशेषत: शिक्षण विभागाला खडबडून जाग आली असून आता महापालिकेच्या सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय प्रभारी शिक्षणाधिकारी अशोक वाकोडे यांनी घेतला आहे. अलकेशला आईने खाऊसाठी पैसे न दिल्याने त्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे अकलेशचे मित्र व शाळेतील अन्य विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. अलकेशच्या मृत्यूमुळे शाळेला एक दिवस सुटी देण्यात आली होती. सायंकाळी अलकेशच्या पार्थिवावर विलासनगरातील हिन्दू स्मशानभूमित शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी शाळेत अनेक विद्यार्थी अनुपस्थित होते. महापालिकेच्या शिक्षण विभागाने बुधवारी तत्काळ सर्व शाळा परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना स्वच्छता विभागाला दिल्यात. त्याप्रमाणे सकाळपासूनच शाळेचे संपूर्ण आवार स्वच्छ करण्यात आले. तसेच बालवयात आत्महत्येचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता बदलविण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय प्रभारी शिक्षणाधिकारी अशोक वाकोडे यांनी घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्या सर्वच शाळेतील शिक्षकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. आत्महत्येच्या विचारपासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने आता महापालिकेच्या ६६ शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रबोधन व मार्गदर्शन करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)