शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus positive story; राज्यातल्या सर्वात लहान चिमुकल्याची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 07:20 IST

Amravati news जन्मल्यानंतर अवघ्या दहाव्या दिवशी कोरोना संक्रमित झालेल्या चिमुकल्याने या आजारावर मात केली आहे. दोन आठवड्यांच्या उपचाराअंती डॉक्टरांनी त्याला मृत्यूच्या जबड्यातून खेचून आणले. तो राज्यातील सर्वात कमी वयाचा कोरोना संक्रमित शिशू असल्याचा दावा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे.

ठळक मुद्देडॉक्टरांच्या चमूने केला यशस्वी उपचार,  परतणार कुटुंबात

संदीप मानकर

लोकमत न्यूज नेटवर्क  

अमरावती: जन्मल्यानंतर अवघ्या दहाव्या दिवशी कोरोना संक्रमित झालेल्या चिमुकल्याने या आजारावर मात केली आहे. दोन आठवड्यांच्या उपचाराअंती डॉक्टरांनी त्याला मृत्यूच्या जबड्यातून खेचून आणले. तो राज्यातील सर्वात कमी वयाचा कोरोना संक्रमित शिशू असल्याचा दावा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे. गुरुवारी त्या डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो कुटुंबात परतणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, वरूड तालुक्यातील अंबाडा येथील अपेक्षा मरस्कोल्हे या महिलेने १६ एप्रिल २०२१ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. जन्माच्या दोन दिवसांतच या नवजाताला सतत ताप येत असल्यामुळे त्याच्या वडिलांनी वरूड शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याला उपचाराकरिता दाखल केले. तेथे तीन दिवसांच्या उपचारानंतर बाळाला घरी आणण्यात आले. मात्र, त्याला परत तीव्र ताप येत असल्याने त्याच रुग्णालयात बाळावर पुढील सात दिवस उपचार करण्यात आला.

सततचे तापामुळे डॉक्टरांनी वेळीच त्याची कोरोनासंबंधी आरटीपीसीआर चाचणी केली. २८ एप्रिल रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आई-वडील निगेटिव्ह होते. घाबरलेल्या आई-वडिलांनी धीर खचू न देता त्याला अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यानच्या काळात श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्याने त्याच्यावर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तातडीने उपचार सुरू केला. मात्र, व्हेंटिलेटर व इतर अत्यावश्यक उपचारांची गरज आणि आयसीयू बेडची कमतरता यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात त्याला शहरातीलच होप रुग्णालय दाखल करण्यात आले. येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नवजात शिशुतज्ज्ञ डॉक्टर अद्वैत पानट यांच्या मार्गदर्शनात त्याच्यावर उपचार सुरू केला. संपूर्ण मजला उपचारासाठी आरक्षित करून त्याला आयसीयूमध्ये परिवर्तित करण्यात आले.

असा झाला उपचारश्वसनाचा त्रास वाढतच असल्यामुळे बाळाला तीन दिवसांपर्यंत अत्याधुनिक सीपीएपी मशीनद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाला. रक्त, प्लाझ्मा, औषधांचा पुरवठा तसेच रक्त तपासणी सुपर स्पेशालिटी रुग्णालयामार्फत होत होती. दरम्यानच्या काळात प्रकृती ढासळत असल्याने डॉक्टर अद्वैत व शासकीय आरोग्य यंत्रणा यांनी रेमडेसिविर सुरू केले. बहुदा हे इंजेक्शन मिळणारे हे बाळ महाराष्ट्रात किंवा भारतात प्रथम असावे, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. रेमडेसिविर व हाय फ्लो ऑक्सिजनच्या परिणामी पाच दिवसांनंतर श्वसनात सुधार दिसू लागला. ताप कमी होत होता. इंटेन्सिव्ह उपचारानंतर बाळाची प्रकृती स्थिरावली. अठराव्या दिवशी बाळाच्या कृत्रिम ऑक्सिजन पुरवठ्याची गरज संपली, त्या दिवशी आईच्या चेहर्‍यावर हास्य फुलले.

नातेवाइकांनी मानले डॉक्टरांचे आभार!

एवढ्या कमी दिवसांच्या बाळाला कोविडमधून बरे करण्याचे आवाहन डॉक्टर अद्वैत पानट व होप हॉस्पिटलच्या चमूने स्वीकारून ते पूर्णत्वास नेले. याबद्दल बाळाच्या आई-वडिलांनी व नातेवाइकांनी डॉक्टरांचे आभार मानले. 

बाळ दोन दिवसांचे असताना त्याला कोरोनाची लागण झाली असावी. दहाव्या दिवशी त्याचे निदान झाले. आता २४ दिवसानंतर तो बरा झाल्याचा आनंद आहे. तो राज्यातील सर्वांत कमी वयाचे कोरोनावर मात करणारा शिशू ठरला आहे.- अद्वैत पानट, नवजात शिशुतज्ज्ञ

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या