coronavirus: The person from Amravati died due to corona | coronavirus : अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी, गुरुवारी मृत्यू झालेली व्यक्ती होती कोरोनाबधित

coronavirus : अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी, गुरुवारी मृत्यू झालेली व्यक्ती होती कोरोनाबधित

अमरावतीअमरावती येथील एका नागरिकाचा २ एप्रिल रोजी इर्विन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यक्तीचे थ्रोट स्वाब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तत्पूर्वी हा नागरिक खासगी रुग्णालयात दाखल होता. सदर व्यक्तीस न्यूमोनिया असल्याचे निदान खासगी डॉक्टरांनी केले होते. रुग्णाला श्वसनक्रियेत अडथळे येत असल्याचे निदर्शनास आल्यावरून खासगी डॉकटर यांनी या व्यक्तीला इर्विन येथे रेफर केले होते. परंतु सदर व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर व्यक्तीचे थ्रोट swab चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी, थ्रोट swab व इतर आवश्यक प्रक्रिया केली जात आहे. नागरिकांनी दक्षतेचे पालन करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. घाबरून न जाता दक्ष राहावे. आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: coronavirus: The person from Amravati died due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.