शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

coronavirus : कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेनमधून मेडिसीनला प्राधान्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 8:08 PM

अमरावती -  मध्य रेल्वे विभागाकडून ‘लॉकडाऊन’च्या काळात जीवनावश्यक वस्तू, शेतीमाल, औषधी व अन्य विविध उत्पादनांची ने-आण करण्यासाठी ८ एप्रिल ते ...

ठळक मुद्देकोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेनमधून मेडिसीनला प्राधान्य अहमदाबाद, राजकोट येथून आले कार्टूनजीवनावश्यक वस्तूंची ने-आण नाहीच 

अमरावती -  मध्य रेल्वे विभागाकडून ‘लॉकडाऊन’च्या काळात जीवनावश्यक वस्तू, शेतीमाल, औषधी व अन्य विविध उत्पादनांची ने-आण करण्यासाठी ८ एप्रिल ते ३ मे दरम्यान कोविड-१९ पार्सल कार्गो रेल्वे ट्रेनची सुविधा केली आहे. आतापर्यंत या पार्सल रेल्वेमध्ये अमरावतीकरांनी केवळ औषधी मागविल्या आहेत, हे विशेष. बडनेरा रेल्वे स्थानकावर गुरुवारी अहमदाबाद येथून विविध औषधांचे सात कार्टून आल्याची माहिती आहे. रेल्वे बोर्डाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रवासी गाड्या बंद केल्यात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात जीवनावशयक वस्तूंची ने-आण सुरू ठेवली आहे. त्याकरिता प्रारंभी मालगाड्या सुरू ठेवल्या, तर आता व्यावसायिक, उद्योजक, शेतक-यांच्या सोयीसाठी कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेन आरंभली आहे. मध्य रेल्वे भुसावळ विभागातून पोरबंदर, मुंबई, शालीमार, नागपूर यादरम्यान पार्सल पाठविले जात आहेत. मुंबई- नागपूर, शालीमार ते मुंबई, पोरबंदर ते शालीमार या दरम्यान कोविड -१९ पार्सल कार्गो रेल्वे ट्रेन ३ मेपर्यंत धावणार आहे. परंतु, अमरावती जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजक, कंत्राटदार, पुरवठादार आदींनी या ट्रेनचा लाभ घेतलेला नाही, अशी रेल्वे सूत्रांची माहिती आहे. आतापर्यंत कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेनमधून औषधी मागविल्या गेल्या आहेत. अहमदाबाद, राजकोट, रायपूर येथून विविध कंपन्यांचे औषध अमरावतीच्या दवा बाजारात आले. मुंबई, कल्याण, इगतपुरी, नाशिक, जळगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर येथे कोविड -१९ पार्सल कार्गो रेल्वे ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावर आतापर्यंत ४७५ मेडिसीन कार्टून उतरविण्यात आल्याची माहिती एका रेल्वे अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndian Railwayभारतीय रेल्वे