शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Amravati; मेळघाटात भूमकानंतर मध्य प्रदेशातील बोगस डॉक्टरच्या उपचाराने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 19:06 IST

Amravati news मध्य प्रदेश सीमारेषेवर वसलेल्या मेळघाटात कोरोनाच्या नावावर बोगस डॉक्टरने उपचार केला. त्यात खंडुखेडा येथील एका आदिवासीचा मृत्यू झाला. काटकुंभ आरोग्य केंद्रातील पथक उपचाराकरिता गेले तेव्हा सोमवारी सायंकाळी त्या बोगस डॉक्टरने गावातून धूम ठोकली.

ठळक मुद्देकोरोनाच्या नावावर आदिवासी पाड्यात धूमतालुका प्रशासनासह बैतूल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

नरेंद्र जावरे

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : मध्य प्रदेश सीमारेषेवर वसलेल्या मेळघाटात कोरोनाच्या नावावर बोगस डॉक्टरने उपचार केला. त्यात खंडुखेडा येथील एका आदिवासीचा मृत्यू झाला. काटकुंभ आरोग्य केंद्रातील पथक उपचाराकरिता गेले तेव्हा सोमवारी सायंकाळी त्या बोगस डॉक्टरने गावातून धूम ठोकली. यासंदर्भात तालुका प्रशासनासह बैतुल (मध्यप्रदेश) जिल्हाधिकार्‍यांना तक्रार करण्यात आली आहे. गत आठवड्यात सेमाडोह येथील एका कोरोनाग्रस्त महिलेचा भूमकाच्या उपचाराने मृत्यू झाला. त्यानंतर ही धक्कादायक घटना उजेडात आली आहे.

मध्यप्रदेशच्या खामला (ता. भैसदेही) येथील राहुल बेले असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याच्या उपचाराने खंडुखेडा येथील सावजी काल्या चिमोटे (५०) या इसमाचा मृत्यू झाला. बोगस डॉक्टरने त्याच्यावर जुजबी उपचार केले. मात्र, प्रकृती खूपजास्त खालावल्याने भैसदेही येथे पाठवून दिले. त्यात त्याचा मृत्यू झाला. मेळघाटातील काटकुंभ, चुरणी, हतरू, जारिदासह जवळपास ४० खेडी मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्याच्या सीमारेषेवर आहेत. त्यामुळे आदिवासींचे सर्वाधिक व्यवहार मध्य प्रदेशात होतात. काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न खंडुखेडा येथे रविवारी कोविड लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील, डॉ. मनोज जाणे, रोशन आठवले, आरोग्य कर्मचारी झाकर्डे, तायडे, आशा, अंगणवाडी सेविका असे पथक गेले होते. मात्र, कोणीच येत नसल्याचे पाहून हे पथक घरोघरी गेले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक घरांत सलाईन टांगलेल्या होत्या, तर रुग्ण बिछान्यावर होते. बोगस डॉक्टर राहुल बेले एका घरात बसलेला दिसला. पथकाने विचारपूस केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पथकाने त्याला पिटाळून लावण्यात आले.

बैतूल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

वैद्यकीय नियमानुसार, एका राज्यातील डॉक्टर दुसऱ्या राज्यात येऊन एकदम उपचार करू शकत नाही. परंतु, बोगस डॉक्टरच्या या उपचार पद्धतीने एकाचा मृत्यू झाला. त्या संदर्भातील तक्रार काटकुंभचे वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील व आरोग्य समन्वयक रोशन आठवले यांनी बैतुल जिल्हाधिकारी, भैसदेही उपविभागीय अधिकारी व चिखलदरा तहसीलदार तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांना केली.

 

खंडुखेड्यात १७ पॉझिटिव्ह रुग्ण

मेळघाटातील आदिवासी पाड्यांमध्ये झपाट्याने कोरोनाची लागण होत आहे. काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण ७८ कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यापैकी डोमा येथे १८ व खंडुखेड्यात १७ रुग्ण आहेत.

खंडुखेडा येथे मध्य प्रदेशच्या खामला येथील बोगस डॉक्टर उपचार करताना आढळून आला. त्याने उपचार केलेल्यांपैकी एका इसमाचा मृत्यू झाला. त्याच्याकडे कुठलेच प्रमाणपत्र नव्हते. त्यासंदर्भातील तक्रार तालुका प्रशासन व बैतूल जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

- आदित्य पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस