शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना : वाघाचा दवाखाना सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:01 IST

या दवाखान्यात उपचारार्थ दाखल होणाऱ्या वाघ, अस्वल, बिबट, हरिण यासह अन्य वन्यजीवांचे नोज, थ्रोट स्वॅब घेण्याची सोय आहे. गरज भासल्यास कोविड-१९ च्या अनुषंगाने हे नमुने मध्य प्रदेशातील भोपाळ, हरियाणातील हिसर आणि उत्तर प्रदेशातील अ‍ॅनिमल हेल्थ इन्स्टीट्यूटमध्ये पाठविले जातील. देशपातळीवर या तीन संस्था मान्यताप्राप्त आहेत.

ठळक मुद्देवाघासह वन्यजिवांचा स्वॅब घेण्याची सोय । आॅक्सिजन सिलिंडरसह औषधी उपलब्ध

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कोरोना विषाणूच्या अनुषंगाने परतवाड्यातील वाघाचा दवाखाना सज्ज ठेवण्यात आला आहे. अमरावती विभागातील हा एकमेव दवाखाना आहे.या दवाखान्यात उपचारार्थ दाखल होणाऱ्या वाघ, अस्वल, बिबट, हरिण यासह अन्य वन्यजीवांचे नोज, थ्रोट स्वॅब घेण्याची सोय आहे. गरज भासल्यास कोविड-१९ च्या अनुषंगाने हे नमुने मध्य प्रदेशातील भोपाळ, हरियाणातील हिसर आणि उत्तर प्रदेशातील अ‍ॅनिमल हेल्थ इन्स्टीट्यूटमध्ये पाठविले जातील. देशपातळीवर या तीन संस्था मान्यताप्राप्त आहेत.दवाखान्यात आॅक्सिजन सिलिंडर तैनात ठेवले आहे. वन्यजीवांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता 'व्हिटॅमीन सी'च्या इन्जेक्शनसह मल्टी व्हिटॅमीनचे इन्जेक्शन आणि औषधी उपलब्ध आहेत. वन्यजीवांना क्वारंटाईन करण्याकरिता आयसोलेशन वॉर्ड म्हणून सात पिंजरे तैनात केले आहे. निर्जंतुक पिंजऱ्यातील एक पिंजरा वाघाकरिता, एक बिबट, एक अस्वलीकरिता, दोन माकडांकरिता व एक हरणाकरिता ठेवण्यात आला आहे.बाहेरच्या व्यक्तीला, वनकर्मचाऱ्यांना प्रवेश बंद केला आहे. वन्यजीव उपचारार्थ दवाखान्यात उपचारार्थ आणणाऱ्याला बाहेरच थांबवून त्या प्राण्याला बाहेरूनच स्वतंत्र पिंजऱ्यात घेण्यात येईल. कोरोना विषाणूचा धोका आणि अमेरिकेतील प्राणी संग्रहालयात ठेवलेल्या वाघाला कोरोनाची बाधा बघता या दवाखान्याला (ट्रान्झिस्ट ट्रिटमेंट सेंटरला) पूर्णत: सॅनिटाईज केले आहे. संपूर्ण आॅपरेशन थेटरचे फ्युमिगेटरच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण केले जात आहे.दवाखान्याच्या दोन्ही प्रवेशद्वारावर स्वतंत्र फुटपाथ ठेवले आहे. वन्यजीवांकरिता आयसोलेशन वॉर्ड म्हणून निर्जंतुक पिंजºयात उपचारार्थ ठेवलेल्या वन्यजीवांवर चार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवणार आहेत. औषधोपचारादरम्यान होणारे बदल या कॅमेऱ्याच्या माध्यमातून नोंदले जाणार आहे. दवाखान्यात मास्क व ग्लोव्ज बंधनकारक आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे मार्गदर्शनात मेळघाट व्याघ्र प्रकल्प, टिपेश्वर अभयारण्य आणि ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघ आणि वन्यजीवांवर कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून क्षेत्रीय वनकर्मचारी व अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलTigerवाघ