कोरोना : वाघाचा दवाखाना सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:00 AM2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:01:19+5:30

या दवाखान्यात उपचारार्थ दाखल होणाऱ्या वाघ, अस्वल, बिबट, हरिण यासह अन्य वन्यजीवांचे नोज, थ्रोट स्वॅब घेण्याची सोय आहे. गरज भासल्यास कोविड-१९ च्या अनुषंगाने हे नमुने मध्य प्रदेशातील भोपाळ, हरियाणातील हिसर आणि उत्तर प्रदेशातील अ‍ॅनिमल हेल्थ इन्स्टीट्यूटमध्ये पाठविले जातील. देशपातळीवर या तीन संस्था मान्यताप्राप्त आहेत.

Corona: Tiger Hospital ready | कोरोना : वाघाचा दवाखाना सज्ज

कोरोना : वाघाचा दवाखाना सज्ज

Next
ठळक मुद्देवाघासह वन्यजिवांचा स्वॅब घेण्याची सोय । आॅक्सिजन सिलिंडरसह औषधी उपलब्ध

अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : कोरोना विषाणूच्या अनुषंगाने परतवाड्यातील वाघाचा दवाखाना सज्ज ठेवण्यात आला आहे. अमरावती विभागातील हा एकमेव दवाखाना आहे.
या दवाखान्यात उपचारार्थ दाखल होणाऱ्या वाघ, अस्वल, बिबट, हरिण यासह अन्य वन्यजीवांचे नोज, थ्रोट स्वॅब घेण्याची सोय आहे. गरज भासल्यास कोविड-१९ च्या अनुषंगाने हे नमुने मध्य प्रदेशातील भोपाळ, हरियाणातील हिसर आणि उत्तर प्रदेशातील अ‍ॅनिमल हेल्थ इन्स्टीट्यूटमध्ये पाठविले जातील. देशपातळीवर या तीन संस्था मान्यताप्राप्त आहेत.
दवाखान्यात आॅक्सिजन सिलिंडर तैनात ठेवले आहे. वन्यजीवांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता 'व्हिटॅमीन सी'च्या इन्जेक्शनसह मल्टी व्हिटॅमीनचे इन्जेक्शन आणि औषधी उपलब्ध आहेत. वन्यजीवांना क्वारंटाईन करण्याकरिता आयसोलेशन वॉर्ड म्हणून सात पिंजरे तैनात केले आहे. निर्जंतुक पिंजऱ्यातील एक पिंजरा वाघाकरिता, एक बिबट, एक अस्वलीकरिता, दोन माकडांकरिता व एक हरणाकरिता ठेवण्यात आला आहे.
बाहेरच्या व्यक्तीला, वनकर्मचाऱ्यांना प्रवेश बंद केला आहे. वन्यजीव उपचारार्थ दवाखान्यात उपचारार्थ आणणाऱ्याला बाहेरच थांबवून त्या प्राण्याला बाहेरूनच स्वतंत्र पिंजऱ्यात घेण्यात येईल. कोरोना विषाणूचा धोका आणि अमेरिकेतील प्राणी संग्रहालयात ठेवलेल्या वाघाला कोरोनाची बाधा बघता या दवाखान्याला (ट्रान्झिस्ट ट्रिटमेंट सेंटरला) पूर्णत: सॅनिटाईज केले आहे. संपूर्ण आॅपरेशन थेटरचे फ्युमिगेटरच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण केले जात आहे.
दवाखान्याच्या दोन्ही प्रवेशद्वारावर स्वतंत्र फुटपाथ ठेवले आहे. वन्यजीवांकरिता आयसोलेशन वॉर्ड म्हणून निर्जंतुक पिंजºयात उपचारार्थ ठेवलेल्या वन्यजीवांवर चार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवणार आहेत. औषधोपचारादरम्यान होणारे बदल या कॅमेऱ्याच्या माध्यमातून नोंदले जाणार आहे. दवाखान्यात मास्क व ग्लोव्ज बंधनकारक आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे मार्गदर्शनात मेळघाट व्याघ्र प्रकल्प, टिपेश्वर अभयारण्य आणि ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघ आणि वन्यजीवांवर कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून क्षेत्रीय वनकर्मचारी व अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Corona: Tiger Hospital ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.