शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५९ बसेस कोरोना फ्री; प्रवासी मात्र बेफिकीर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:14 IST

एसटीला अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग: कोरोना नियमांची अंमलबजावणी आवश्यक जितेंद्र दखने अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या बसेसना अँटिमायक्रोबियल केमिकल ...

एसटीला अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग: कोरोना नियमांची अंमलबजावणी आवश्यक

जितेंद्र दखने

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या बसेसना अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येत आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून, ३६८ बसेसपैकी २३८ बसेस अँटिमायक्रोबियल केल्या जाणार आहेत. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात ५९ बसेस अँटिमायक्रोबियल कोटिंग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना विषाणूपासून सुरक्षाकवच मिळणार आहे. या बसेस कोरोना फ्री झाल्या असल्या तरी प्रवासी मात्र बेफिकीर असल्यासारखे वागत आहेत. अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग प्रक्रिया बसेसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात करणारी एसटी पहिली वाहतूक संस्था आहे. एसटी बसमध्ये अनेक ठिकाणी प्रवासी स्पर्श करतात. ज्यामुळे कोरोना व इतर विषाणूंच्या प्रचाराचा धोका असतो. तो टाळण्यासाठी एसटीने बसेसना अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉक्स

५९ बसेसना कोटिंग

अमरावती ५२-४६

बडनेरा ३४-१३

दर्यापूर २७-००

परतवाडा ३३-००

चांदुर बाजार २१-००

वरुड ३०-००

मोर्शी २३-००

चांदुर रेल्वे २१-००

बॉक्स

एका एसटीला वर्षातून सहा वेळा होणार कोटिंग

एसटीला अँटिमायक्रोबियल कोटिंग केल्यानंतर जवळपास दोन महिने प्रवाशांना सुरक्षा मिळणार आहे.

प्रत्येक दोन महिन्याला एसटीचा खर्च ९ हजार ५०० रुपये आहे, तर एका एसटीला वर्षातून ६ वेळा कोटिंग केली जाईल. यापूर्वी थेट विमान कंपन्या या तंत्राचा उपयोग करत होत्या.

बॉक्स

बांधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही, पण बाजुलाच बसला असल्यास?

एसटीची प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, बहुतांश प्रवासी मास्क वापरत नाहीत. त्यामुळे धोका आणखी वाढला आहे.

अशातच एसटी बसमध्ये एखादा कोरोना पॉझिटिव्ह असल्यास इतर प्रवाशांची चिंता वाढणार आहे.

बॉक्स

विषाणू नष्ट करण्याची क्षमता

एसटीला अँटिमायक्रोबियल कोटिंग करण्यात येत आहे. प्रवाशांनी बसच्या गेटचे हँडल, सीटच्या पुढील हँडल आणि इतर भागाला हात लावला आणि त्याच्या हातावर विषाणू असला तरी कुठलाही विषाणू नष्ट करण्याची क्षमता या कोटिंगमध्ये आहे. यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे.

बॉक्स

प्रवासी म्हणतात

एसटीमध्ये अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात आल्याने कोरोनाचा धोका कमी होणार आहे. मात्र, प्रवासादरम्यान काही प्रवासी विनामास्क दिसून आले. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे आवश्यक आहे.

देवेंद्र कावरे, प्रवासी

कोट

कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध उठल्यानंतर पुन्हा बसने प्रवास सुरू केला आहे. परंतु यावेळी प्रवासी सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसून येत नाहीत. त्यामुळे धोका आणखी वाढू शकतो.

आशिष मानकर, प्रवासी