शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणीपुरवठा आरोग्याला धोका

By admin | Updated: June 27, 2015 00:09 IST

दरवर्षी पाऊस पडल्यानंतर प्राधिकरणकडून गढूळ पाणीपुरवठा होतो.

तुरटीचे प्रमाण वाढविले : प्राधिकरणकडून उपाययोजना सुरुवैभव बाबरेकर अमरावतीदरवर्षी पाऊस पडल्यानंतर प्राधिकरणकडून गढूळ पाणीपुरवठा होतो. पाणी ढवळले गेल्याने ही स्थिती उत्पन्न होते. मात्र, यामुळे आजार बळावतात. सद्यस्थितीत शहरातील अनेक भागांत प्राधिकरणद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दिसत असून ही बाब नागरिकांच्या आरोग्याला घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पावसाळ्यात नदी, नाले, तलाव व अन्य जलस्त्रोतातील पाणी सिंभोरा धरणात जमा होते. यानंतर धरणाची पातळी हळूहळू वाढू लागते. सिंभोरा धरणाची जलपातळी मर्यादा ३४२.५० मीटर असून सद्यस्थितीत धरणात ३३८.९८ मीटर पाणी जमा झाले आहे. नवीन पाणी येत असल्याने पाणी ढवळले जात आहे. त्यामुळे खालचा गाळ वर येऊन गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सिंभोरा येथील हे पाणी अमरावतीतील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईनद्वारे आणले जाते. त्यानंतर जलशुध्दीकरण केंद्रावर ते शुध्द करून त्याचा अमरावतीकरांना पुरवठा केला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून हीच प्रक्रिया अविरत सुरु आहे. ही स्थिती दरवर्षीच उद्भवते. दररोज ११० दशलक्ष लिटर पाणीपुरवठाजलशुध्दीकरण के्रंदावरून दररोज अमरावतीकरांना ११० दशलक्षलिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे. मजीप्राकडे जवळपास एक लाख ग्राहक असून सुमारे पाच लाख नागरिक पाणी पीत असल्याचे निदर्शनास येते. गढूळ पाण्यामुळे पाच लाख नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे दरवर्षीच पहायला मिळते. पाण्याची गढुळता वाढताच तुरटीचे डोज वाढविण्यात येते. दरवर्षीच पावसाळ्यात धरणातील पाणी ढवळले जाते. अशावेळी अल्प प्रमाणात गढूळ पाणी दिसून येते. पाणी तपासणी करून ते पिण्यास योग्य असल्याची शहानिशा करूनच नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येते. - डी.एन. आमले, उपअभियंता(यांत्रिकी) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.गढूळ पाण्यात जीवजंतूचा प्रादुर्भाव असू शकतो. दूषित पाण्यामुळे डायरिया व उलटी आदी आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे गढूळ पाणी उकळून थंड करून प्यावे. या दिवसांत संसर्ग होण्याची भीती असते.- अविनाश लव्हाळे, आरोग्य उपसंचालक.