शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बोदडच्या बहुर्डा नदीवरील पुलाचे बांधकाम दर्जाहीन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST

फोटो - करजगाव ०३ एस करजगाव : चांदूर बाजार तालुक्यातील करजगाव-बहिरम मार्गाला जोडणारा लगतच्या बोदड गावातील पूल हा ...

फोटो - करजगाव ०३ एस

करजगाव : चांदूर बाजार तालुक्यातील करजगाव-बहिरम मार्गाला जोडणारा लगतच्या बोदड गावातील पूल हा अतिशय जीर्ण होत पुरात वाहत गेल्यानंतर सार्वजनिक विभागाने पूर हानी निधीतून सदर पूलासोबत त्याच रस्त्यावरील आणखी दोन पुलांकरिता तीन कोटींचे अंदाजपत्रक मंजूर केले. या पुलांचे काम निकृष्ट होत आहे. मातीमिश्रित रेती व कमी जाडीच्या पोलादाचा वापर होत असल्याने हा पूल तकलादू ठरेल, असा आक्षेप परिसरातील ग्रामस्थ घेत आहेत.

डिसेंबरमध्ये बोदड गावातील पुलाचे व त्यापुढील दोन पुलांचे बांधकाम सुरू करण्यात आले. पुलाच्या बांधकामात त्याच नदीतील मातीमिश्रित रेतीचा वापर करण्यात आला आहे तसेच लोखंडी बार हे ८ व १० एमएमचे बार वापरण्यात आले. उंच व रुंदी अधिक असलेल्या या पुलासाठी सिमेंटदेखील कमी प्रमाणात वापरण्यात आले.

करजगाव-बहिरम मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. विदर्भातील प्रसिद्ध बहिरम यात्रेला नेणारा हा रस्ता असून, शेतातील साहित्याची वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे जड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. अशात या रस्त्यावरील या पुलाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्यास परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका आहे. याच पुलावरून संदीप दांडगे नामक व्यक्ती वाहून गेला होता. बांधकाम निकृष्ट झाल्यास त्याची पुनरावृत्ती होईल का, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

------------------

कामावर चांगले प्रतीचे साहित्य वापरण्यात आले असून, कन्हानची रेती वापर सुरू आहे. २० मिमी, १६ मिमी, १० मिमी जाडीचे पोलाद आतापर्यंत वापरण्यात आले आहे.

- प्रदीप निर्मळ, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चांदूरबाजार