शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जंगलांचे संवर्धन करणे काळाची गरज

By admin | Updated: April 13, 2017 00:16 IST

तालुक्यात चिरोडी व पोहरा परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र, अवैध वनकटाई, मेंढपाळाचा हैदोस, काठेवाड्यांच्या वनचराईमुळे जंगलाचे मोठे नुकसान होत आहे.

वीरेंद्र जगताप : चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पणचांदूर रेल्वे : तालुक्यात चिरोडी व पोहरा परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र, अवैध वनकटाई, मेंढपाळाचा हैदोस, काठेवाड्यांच्या वनचराईमुळे जंगलाचे मोठे नुकसान होत आहे. जंगले उजाड झाली तर त्याचा सरळ फटका पावसाला बसतो. पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जंगलांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले. चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पणाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चांदूररेल्वेचे नगराध्यक्ष नीलेश सूर्यवंशी होते तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंत मीना, चांदूरेल्वेचे उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे, अमरावतीचे सहायक वनसंरक्षक (कॅम्पा व वन्यजीव) आर.जी.बोंडे, सहायक वनसंरक्षक ए.डब्ल्यू.कविटकर, चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे पिंपळाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले, जंगली प्राणी शेतात शिरल्यामुळे त्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले असून उत्पादनात देखील घट आली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी हे कारण देखील असू शकते. त्यामुळे आत्महत्येच्या याकारणांचा समावेश करायला हवा. उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अनंत गावंडे, संचालन सदानंद पाचंगे तर आभार प्रसाद वाकोडे यांनी केले. यावेळी इतरही मान्यवरांची समयोचित भाषणे झालीत. वन्यपशुंचा उच्छाद रोखण्यासाठी आवश्यक ती पाऊले तातडीने उचलण्यात यावी, अशी भूमिका मांडण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)