शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काँग्रेसचे मंथन

By admin | Updated: October 10, 2016 00:18 IST

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले आहे.

जिल्हा काँग्रेसची बैठक : प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच उमेदवारीची संधीअमरावती : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले आहे. त्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी जिल्हा ग्रामीण काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षनिरीक्षक आणि जिल्हाध्यक्षांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. दरम्यान पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांचाच उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे मत जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी बैठकीत स्पष्ट केले.जिल्ह्यातील १० नगरपालिका, ५९ जिल्हा परिषद गट आणि ९८ पंचायत समितीच्या गणासाठी येत्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे जिल्हा प्रभारी बंडू सावरबांधे, शेखर शेंडे, रत्नदीप दहीवले, संजय बोडखे आदींसह आ. यशोमती ठाकूर, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, माजी आ. केवलराम काळे, सुलभा खोडके उपस्थित होते. प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांचाच उमेदवारीकरिता विचार केला जाईल, असे बबलू देशमुख यांनी स्पष्ट केले. सध्या सरकार विरोधात वातावरण असून कार्यकर्त्यांनी त्याचा लाभ घेत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचे आवाहन पक्षनिरीक्षक बंडू सावरबांधे यांनी केले. बैठकीला महिला जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, यशवंत शेरेकर, प्रल्हाद ठाकरे, सतीश हाडोळे, गिरीश कराळे, महेंद्रसिंग गैलवार, बाबासाहेब भोकरे, मोहन पाटील, संजय लायदे, मोहन सिंगवी, सुधाकर भारसाकळे, हरेराम मालवीय, बिंदू मंगरोळे, कांचनमाला गावंडे, उषा उताणे, मनोज जयस्वाल, विलास पवार, भागवंत खांडे, संजय मार्डीकर, प्रकाश काळबांडे, बच्चू बोबडे, प्रवीण सवई व पदाधिकारी उपस्थित होते.