शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत काँगे्रस-राष्ट्रवादीत धुसफूस

By admin | Updated: July 6, 2014 23:35 IST

महापालिकेत सत्तापक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये काही मुद्यांवरुन धुसफूस सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही गटांत खेळीमेळीचे वातावरण होते. मात्र, त्यानंतर राजकीय

आपसात दरी वाढली : शह-काटशहाच्या राजकारणाला प्रारंभगणेश वासनिक - अमरावतीमहापालिकेत सत्तापक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये काही मुद्यांवरुन धुसफूस सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही गटांत खेळीमेळीचे वातावरण होते. मात्र, त्यानंतर राजकीय समीकरण पूर्णत: बदलले आहे. हल्ली लहान, मोठ्या कारणांवरुन शह-काटशह देण्यास सुरूवात झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास ही संभाव्य नवीन राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकते.आ. रावसाहेब शेखावत आणि माजी आमदार सुलभा खोडके यांचे वर्चस्व असलेल्या काँग्रस-राष्ट्रवादी आघाडीने महापालिकेत २०१२ मध्ये सत्ता स्थापन केली. या दोन्ही नेत्यांनी आपसात करार करून पहिल्या वर्षी काँग्रेसच्या वाट्याला महापौर तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद देण्याचे ठरविण्यात आले. दोन्ही गटांना अडीच-अडीच वर्षांसाठी स्थायी समिती सभापतीपद देण्याचे सूत्र ठरविण्यात आले. तसेच दुसऱ्या टप्प्यातील महापौरपद राष्ट्रवादीकडे तर उपमहापौरपद काँग्रेसला देण्याचा लिखित करार झाला आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने आ. रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा-कौर यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी जाहीर करताच राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश सचिव संजय खोडके यांनी जोरकसपणे विरोध दर्शविला. ही उमेदवारी मान्य नाही आणि प्रचारही करणार नाही, असे प्रदेशाध्यक्षांसमोर खोडके यांनी स्पष्ट सांगितले. परिणामी संजय खोडकेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागली गेली. २३ सदस्य संख्येच्या राष्ट्रवादीतून सात सदस्यांनी खोडके यांच्याशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. १६ सदस्य खोडके गटासोबत राहिलेत. या गटाचे गटनेता म्हणून अविनाश मार्डीकर तर सात सदस्यांच्या राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुनील काळे यांनी महापालिकेत कामकाज सांभाळण्यास सुरूवात केली आहे. आता काँग्रेस-राकाँमधील ही धुसफूस कोणते वळण घेते, याकडे लक्ष लागले आहे.