शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

निविदा प्रक्रियेपूर्वीच लाखोंची कामे पूर्ण

By admin | Updated: September 11, 2016 00:19 IST

तालुक्यामधील वऱ्हा ग्रामपंचायतीच्या आवारात पेव्हींग ब्लॉक बसविण्याची निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच ३ लाख ६४ हजारांचे काम पूर्ण करण्याची ...

वऱ्हा ग्रामपंचायतीची करामत : सरपंच, सचिवाची चुप्पी
तिवसा : तालुक्यामधील वऱ्हा ग्रामपंचायतीच्या आवारात पेव्हींग ब्लॉक बसविण्याची निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच ३ लाख ६४ हजारांचे काम पूर्ण करण्याची अजब किमया सरपंच व सचिवांनी साधली आहे. या नियमबाह्य कामात लाखोंचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार येथील नीलेश श्रीखंडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी यांच्याकडे ८ सप्टेंबर रोजी केली.
तिवसा पंचायत समितीअंतर्गत वऱ्हा येथील ग्रामपंचायत आवारात पेव्हींग ब्लॉक बसविण्याकरिता वऱ्हा ग्रामपंचायतीने ई-निविदा प्रसिद्ध केली. निविदा भरण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर आहे व कामाची किंमत ३ लाख ६३ हजार ९७५ रुपये अशी दर्शविण्यात आली. मात्र हे काम वऱ्हा ग्रामपंचायतीने एक महिन्यापूर्वीच पूर्ण केले असल्याने झालेल्या कामाची ई-निविदा प्रसिद्ध करणे ही शासनाची व ईच्छुक कंत्राटदाराची एक प्रकारची फसवणूक आहे. या सर्व प्रकारामध्ये वऱ्हा ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी शासन प्रक्रियेला फाटा देऊन संपूर्ण कामावर किमान ७ लाख ३० हजाराचा खर्च दाखविला आहे. यामध्ये लाखोंचा गैरव्यवहार व शासकीय रकमेची अफरातफर झाल्याचा आरोप श्रीखंडे यांनी केला आहे. झालेल्या कामाच्या पुराव्यादाखल श्रीखंडे यांनी ई-निविदेची प्रत व झालेल्या कामाचे छायाचित्र सीईओंच्या सुपूर्द केला असल्याने या प्रकरणाच्या चौकशीत संबधितांवर कारवाई व गुन्हे दाखल करावे, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात वऱ्हा ग्रामपंचायतीचे सचिव बडासे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)