शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे सामूहिक मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 00:18 IST

शेतकरी हितासाठी लढणारे, त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलने करणारे युवा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे ...

देवेंद्र भुयारच्या तडीपारीचा निषेध : शिख समुदायाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वरूड : शेतकरी हितासाठी लढणारे, त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलने करणारे युवा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या विरूद्ध कटकारस्थान रचून गुन्हे दाखल करण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. सर्वसामान्यांच्या हक्कांकरीता तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या युवा नेत्यावर अन्याय झाल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्थानिक तहसील कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला. देवेंद्र भुयारांची तडीपारी रद्द न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्याची कार्यकर्त्यांची तयारी आहे. शेतकरी एकीकडे दुष्काळाशी दोन हात करीत असताना प्रशासनाकडून मुस्कटदाबी होत होती तर कर्जबाजारीपणामुळे जप्ती आदेश काढले जात होते. खचलेल्या विहिरीच्या अनुदानाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने युवा स्वाभीमानी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी सतत ९ वर्षांपासून शेतकऱ्यांकरीता आंदोलने, धरणे, मोर्चे काढून संघर्ष केला. या आदोलनांदरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे पोलिसांनी त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावावर उपविभागिय अधिकारी,मोर्शी यांनी शिक्कामोर्तब केले. यामुळे तालुक्यातील शेतकरी, शेतमजुरांमध्ये असंतोष निर्माण झाला. या तडीपारीच्या निषेधार्थ बुधवारी स्थानिक तहसील कार्यालयापुढे शेकडा ेशेतकऱ्यांनी मुंडनकरुन देवेंद्र भूयार यांच्या तडीपारीचा निषेध केला व ही तडीपारी रद्दकरण्याची मागणी केलीे. तर शहरातील शिख बांधवांनी सुध्दा समाजसेवक तसेच शेतकरी नेते देवेंद्र भुयार यांच्या तडीपारीविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून तातडीने तडीपारी रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा स्वाभिमानी ेशतकरी संघटना तसेच तालुक्यातील शेतकरी जेलभरो आंदोलन करण्याची तयारी करणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले. यावेळी शैलेश ढोबळे, ऋषिकेश राउत, मंगेश ठाकरे, उमेश डबरासे, भगवंत वानखडे, प्रफुल्ल अनासाने, जगबीरसिंग भावे, सतनामसिंग बावरी, मनोजसिंग भावे, नखानसींग पव्वा, समदरसिंग बावरी, कृणालसिंग बावरी, गोविंदसिंग बावरी, रॉबिनसींग भावे, अजयसिंग बावरी, ओंकार बोहरूपी, कैलास अमझरे, मनीष बोहरुपीसह शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)