शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेसाठी ५ ते ७ जानेवारीपासून आचारसंहिता !

By admin | Updated: December 30, 2016 00:58 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितींचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. सध्या मतदार यादीचा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : प्रशासनाची लगबग, बैठकीचा धमाका अमरावती : जिल्हा परिषद व पंचायत समितींचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. सध्या मतदार यादीचा कार्यक्रम सुरू आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्या दुसऱ्या दिवशी नामनिर्देशन अर्जाची प्रक्रिया साधारणपणे सुरू होते व त्याच्या काही दिवसांपूर्वी निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची लगबग सुरू आहे. सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी वर्तविली आहे. जिल्हा परिषदेचा कालावधी १९ मार्च २०१७ रोजी संपत आहे. चांदूररेल्वे, तिवसा व धामणगाव वगळता उर्वरित १० पंचायत समितींचा कालावधी १३ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येत आहे. त्याच्या दोन महिन्यापूर्वी सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतात. यापूर्वी सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुका पूर्व ९ जानेवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली व १७ जानेवारी २०१२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर १८ जानेवारीपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. निवडणुकीची घोषणाही ३ जानेवारी २०१२ ला झाली होती. या पार्श्वभूमीवर यंदा १२ जानेवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होत आहे. त्यावर १७ जानेवारीपर्यंत हरकती, आक्षेप मागविले आहे व २१ जानेवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या दिनांकानंतर लगेच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे व याचे १० ते १२ दिवसांपूर्वी निवडणुकीची घोषणा आयोगाद्वारा होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यासोबत महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होईल, अशी शक्यता आहे. त्याच दिनांकांपासून आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे प्रशासनाची लगबग वाढली आहे. (प्रतिनिधी) महसूलमंत्र्यांचे सूचक वक्तव्य जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकांमध्ये ७ जानेवारी २०१७ पासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याचे सूचक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी कोल्हापूर येथील कार्यक्रमात केले. या सर्व निवडणुका यावेळी एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान आयोागद्वारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.