शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

१५ एप्रिलपासून राज्यभरातील तूर खरेदी बंद?

By admin | Updated: April 13, 2017 00:12 IST

तूर खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांना संभ्रमात ठेवणाऱ्या शासनाने १५ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाचे पत्र : शेतकऱ्यांना मिळणार केवळ दोन दिवस परतवाडा : तूर खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांना संभ्रमात ठेवणाऱ्या शासनाने १५ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील पत्र बुधवारी बाजार समित्यांना पाठविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये तूर विक्री करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी मिळणार आहे. नाफेडच्या माध्यमातून राज्यात ४ जानेवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र विक्रमी उत्पादन झाल्यामुळे व बाजार समित्यांमधील मर्यादांमुळे तुरीची खरेदी मंदावली होती. यामुळे शेतकरी निराश झाला होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हजारो क्विंटल तूर बाजार समित्यांत मोजणी अभावी शिल्लक होती. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरी देखील तूर साठवून आहे.तूर खरेदी बंद करण्याचे पत्र बाजार समित्यांना काही दिवसांपूर्वी मिळाले होते. यामुळे बाजार समितीने तूर खरेदी करण्यास नकार दिला होता. परिणामी शेतकरी संतापले होते. दरम्यान तूर खरेदी करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. मात्र आता पूर्णत: तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून बाजार समित्यांनी १५ तारखेपासून तूर खरेदी करू नये, असे आदेश दिले आहेत. यांसदर्भातील पत्र बुधवारी सायंकाळी बाजार समित्यांना मिळाले असल्याचे सांगण्यात येते. नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी केली जात आहे. मोजलेल्या तुरीचा मोबदला अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. दुसरीकडे बॅकांमधून धनादेशाची रक्कम लवकर खात्यात जमा होत नसल्याने देखील शेतकरी त्रस्त झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)१५ एप्रिलपासून तूर खरेदी केंद्र बंद करण्याचे केंद्र शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार संबधित केंद्राला तसे पत्र पाठविले आहे. मात्र विहित मुदतीमध्ये आलेल्या मालाची मोजणी केली जाईल.- अशोक देशमुख व्यवस्थापक, व्हीसीएमएफशासनाने तुरीचा शेवटाचा दाणा खरेदी करण्यापर्यंत खरेदी करण्याचे जाहीर केले होते. हजारो क्विंटल तूर अजुनही शेतकऱ्यांच्या घरात आहे. परिणामी खरेदीची मुदत न वाढविल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील.- कुलदीप काळपांडे, उपसभापती, कृ.उ. बाजार समिती अचलपूर