शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील १० नाके बंद

By admin | Updated: August 16, 2014 23:11 IST

वाहतुकदार संघटनेच्या मागणीनुसार शासनाने १५ आॅगस्टपासून रहदारी शुल्क वसुली बंद करण्याच्या निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून महापालिका सीमेवरील रहदारी शुल्क

शासन निर्णय : महापालिकेच्या रहदारी शुल्क वसुलीला ‘ब्रेक’अमरावती : वाहतुकदार संघटनेच्या मागणीनुसार शासनाने १५ आॅगस्टपासून रहदारी शुल्क वसुली बंद करण्याच्या निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून महापालिका सीमेवरील रहदारी शुल्क वसुलीचे १० नाके बंद केले आहेत. या निर्णयामुळे वाहतुकदारांना दिलासा मिळाला असला तरी महापालिकेला वर्षाकाठी १२.५० कोटींचा फटका बसणार आहे.महापालिकेच्या सीमेवरुन जाणाऱ्या प्रत्येक वाहनांकडून रहदारी शुल्क वसुल केला जात होता. अमरावती नगरपरिषद ते महापालिका स्थापनेपासून सन २०१४ पर्यंत रहदारी शुल्क वसुलीची प्रक्रिया निरंतर सुरु होती. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गत आठवड्यात एलबीटी बाबत निर्णय घेत असताना वाहनांकडून वसुल केले जाणारे रहदारी शुल्क बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी १५ आॅगस्ट रोजी केली जाईल, असा शब्द देखील त्यांनी वाहतुकदार संघटनेच्या प्रतिनिधिनींना दिला होता. त्यानुसार १४ आॅगस्ट रोजी राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने महापालिकेला रहदारी शुल्क वसुली बंद करण्याबाबत पत्र पाठविले होते. परिणामी महापालिका प्रशासनाने सीमेवरील १० नाक्यावरुन होणारे रहदारी शुल्क वसुली थांबविली आहे. रहदारी शुल्क वसुली बंद करण्याच्या शासन आदेशाची माहिती अभिकर्त्यालासुद्धा देण्यात आली आहे. एलबीटीबाबत व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविल्याने महापालिकांमध्ये कोणता कर लागू करावा, ही मुभा राज्य शासनाने महापालिकांना दिली आहे. हल्ली एलबीटीची वसुली फारच मंदावली असल्याने महापालिकेचा आर्थिक कणा ढासळला आहे. व्यापाऱ्यांची मानसिकता लक्षात घेत येत्या काही दिवसांत एलबीटी किंवा जकात या दोन करापैकी कोणता कर महापालिकेत लागू करावा, याविषयी लवकरच आमसभेत शिक्कामोर्तब केला जाईल, अशी माहिती आहे. शासनाने देखील तसे मार्गदर्शक तत्वे दिली असून महापालिका प्रशासन त्याअनुशंगाने तयारीला लागले आहे. महापालिकेची ढासळलेली आर्थिक स्थिती सुरळीत व्हावी, याकरिता सदस्यदेखील जकात कर आणण्याच्या तयारीत आहेत. महापालिकेत जकात कर लागू होताच बंद करण्यात आलेले रहदारी शुल्क वसुली पुन्हा सुरु केली जाईल, अशी माहिती आहे.