शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

दावेदारांची भाऊगर्दी, ११८ नामांकन

By admin | Updated: October 7, 2015 01:35 IST

७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या शिक्षक बँकेच्या निवडणूक रणधुमाळीने वेग घेतला आहे. मंगळवारपर्यंत ११८ इच्छुकांनी नामांकन दाखल केल्याने ...

अमरावती : ७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या शिक्षक बँकेच्या निवडणूक रणधुमाळीने वेग घेतला आहे. मंगळवारपर्यंत ११८ इच्छुकांनी नामांकन दाखल केल्याने २१ संचालक पदांसाठी उमेदवारांची भाऊगर्दी राहणार असल्याचे प्राथमिक चित्र आहे. या निवडणुकीची प्रक्रिया ३ आॅक्टोबरपासून सुरू झाली असून ७ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. यावर्षी प्रथमच ही निवडणूक विभागीय स्तरावर होत असून प्रत्येक मतदाराला २१ शिक्के मारावे लागणार आहेत. आतापर्यंत या निवडणुकीसाठी २२० पेक्षा अधिक नामांकनाची उचल झाली असून प्रमुख चार पॅनेलच्या उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. चार पॅनेलसह काही अपक्षही निवडणूक रिंगणात उतरले असून प्रत्येक जण बँकेच्या विकासाचा दावा करीत आहे. मंगळवारी कांतानगरस्थित उपनिबंधक कार्यालयात उमेदवारांसह त्यांच्या शेकडो समर्थकांनी गर्दी केल्याने या परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. या गर्दीत शिक्षक आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा समावेश होतो.शिक्षकांची जिव्हाळ्याची बँक असलेल्या जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत प्रथमच जि. प. कर्मचारी संवर्गातून एक प्रतिनिधी निवडला जाणार असल्याने जिल्हा परिषदेचे कर्मचारीसुद्धा राजकारणात रंगले आहेत. प्रत्यक्ष भेटीगाठीनंतर उमेदवारांचा भर असून अनेक उमेदवारांनी प्रचाराचा पहिला टप्पा पार केला आहे. उल्लेखनीय म्हणजे निव्वळ कागदावर असलेल्या संघटनासुद्धा उपद्रवमूल्य दाखविण्यासाठी पत्रकबाजी करीत आहे. अनेक पॅनेलमधील समर्थित संघटनांचे नाव पाहिले असता कर्मचारी व शिक्षकांच्या एवढ्या संघटना खरेच आहेत का, हा प्रश्न उपस्थित होतो.