मुलांना भेटण्यापूर्वीच आईचा मृत्यूू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:10 IST2018-08-17T01:09:50+5:302018-08-17T01:10:24+5:30

अचलपूर तालुक्यातील ग्राम वझ्झर येथून दर्यापूरच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलांची भेट घेण्याची आईची इच्छा अधुरी राहिली. जवळापूर फाट्यावर अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला.

Before the children can meet their mother | मुलांना भेटण्यापूर्वीच आईचा मृत्यूू

मुलांना भेटण्यापूर्वीच आईचा मृत्यूू

ठळक मुद्देदुचाकीला अपघात : जवळापूर फाट्यावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
पथ्रोट : अचलपूर तालुक्यातील ग्राम वझ्झर येथून दर्यापूरच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलांची भेट घेण्याची आईची इच्छा अधुरी राहिली. जवळापूर फाट्यावर अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला.
वैजयंती सुखराम बेठे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. पती सुखराम मणिराम बेठे (३५) तिच्यासह दोन वर्षीय मुलाला घेऊन दुचाकीने दर्यापूर येथे शिकणारे सूरज (१४) व सोनाली (१२) या अपत्यांना भेटण्यासाठी १५ आॅगस्टला निघाला. त्याच्या एमएच २७ एवाय ६५०२ क्रमांकाच्या दुचाकीला पहाटे साडेपाच वाजता अंजनगाव सुर्जीहून परतवाड्याकडे जाणाºया अज्ञात ट्रकने जवळापूर फाट्यानजीक कृष्ण मंदिराजवळ धडक दिली. यात वैजयंतीचा जागीच मृत्यू झाला, तर सुखराम व दोन वर्षाचा मुलगा सुखरूप बचावले.
झेंडावंदनाची तयारी करीत असलेले पथ्रोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ठाणेदार सतीश आडे, एएसआय सुभाष फुंदे, सुनील पवार, प्रमोद चौधरी, बुरनासे, प्रकाश जाधव, राजाराम मेहश्रे, चालक बाळू धुर्वे यांनी पंचनामा करून मृतदेह अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविला.
मुलांनी फोडला हंबरडा
पथ्रोट पोलिसांकडून अपघाताबाबत दर्यापूर येथे शिकत असलेल्या सूरज व सोनालीला कळविण्यात आली. आश्रमशाळा प्रशासनाने त्यांना घटनास्थळी रवाना केले. आईचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. दुसरीकडे सुखराम व त्याच्याकडे असलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याची स्थितीदेखील दयनीय होती.

Web Title: Before the children can meet their mother