शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री येणार मामांच्या गावी

By admin | Updated: November 18, 2014 22:47 IST

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अमरावतीत पहिल्यांदाच येत आहेत. २९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असून आढावा बैठक, अधिकाऱ्यांची हितगुज, भाजप पदाधिकारी,

बालाजी प्लॉट परिसरात लगबग : रस्ते दुरुस्ती, साफसफाईची कामे वेगातअमरावती : मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अमरावतीत पहिल्यांदाच येत आहेत. २९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असून आढावा बैठक, अधिकाऱ्यांची हितगुज, भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असा त्यांचा नियोजित दौरा आहे. त्यांचे मामा असलेल्या कलोती परीवाराकडेही जाणार आहेत. त्यामुळे स्थानिक बालाजी प्लॉट परिसरात रस्त्याची दुरुस्ती, साफसफाई आदी कामे वेगाने केली जात आहेत. या भागात दोन दिवसांपासून महापालिका प्रशासन तळ ठोकून असल्याने खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री मामाच्या गावाला येत असल्याची प्रचिती अनुभवयास मिळत आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांचे बालपण अमरावतीत गेले. त्यांचे या शहराशी भावनिक नाते जुळलेले आहेत. अंबानगरी हे त्यांचे आजोळ आहे. अंबानगरीत आले आणि मामाच्या घरी भेटीला गेले नाही, असे न करता ते आपल्या मामाच्या घरी भेट देणार आहेत. आढावा बैठकीसाठी अमरावतीचा दौरा निश्चित करताना त्यांनी स्थानिक बालाजी प्लॉट परिसरातील रहिवासी असलेले त्यांचे मामा कलोती यांच्याकडे भेटीसाठी जाण्याचे ठरविले आहे. रमेश कलोती, चंद्रकांत कलोती, रोहीत कलोती यांच्या ‘प्रभा निवास’ येथे मुख्यमंत्री संपूर्ण कलोती कुटुंबातील सदस्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या तयारीसाठी बालाजी प्लॉट परिसरात लगबग सुरु झाली आहे. याच श्रुंखलेत मंगळवारी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, आयुक्त अरुण डोंगरे, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, अजय सामदेकर, वैद्यकीय आरोग्य देवेंद्र गुल्हाने, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, अभियंता काझी, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे आदींनी बालाजी प्लॉट परिसरातील पाहणी दौरा केला. या भागातील रस्ते दुरुस्ती कामे, नाल्यांची साफसफाई, प्रकाश व्यवस्था, वृक्ष कटाई, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, वराह पकडण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. यावेळी कलोती यांच्या घरासमोरील रस्ता, शिंगणे ते देशमुख यांच्या घरापर्यंतचा रस्ता दुरुस्तीचे कामे तातडीच्या निधीतून करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी प्रशासनाला दिले आहेत. (प्रतिनिधी)