चांदी की डाल पर..., गौतमीसोबत थिरकले भाजप आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 11:14 IST2024-09-05T11:14:06+5:302024-09-05T11:14:36+5:30

BJP MLAs danced with Gautami Patil: उमरखेडमध्ये मंगळवारी झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटीलची उपस्थिती होती. येथे गौतमी पाटीलने हिने गाण्यावर ठेका धरल्यानंतर भाजप आमदार संदीप धुर्वे यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही.

Chandi ki dal par..., BJP MLAs danced with Gautami Patil | चांदी की डाल पर..., गौतमीसोबत थिरकले भाजप आमदार

चांदी की डाल पर..., गौतमीसोबत थिरकले भाजप आमदार

यवतमाळ - उमरखेडमध्ये मंगळवारी झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटीलची उपस्थिती होती. येथे गौतमी पाटीलने हिने गाण्यावर ठेका धरल्यानंतर भाजप आमदार संदीप धुर्वे यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी गौतमीसोबत ‘चांदी की डाल पर सोने का मोर’ या गाण्यावर ठेका धरत डान्स केला.  याचा  व्हिडीओ व्हायरल झाला. यावरून विरोधक टीका करीत आहेत.  शेतीसह घरांचे नुकसान झाले, अशा संकटात आमदार गाण्यावर ठेका धरत असल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला. 

मी नेहमी शेतकऱ्यांचे हित पाहतो. मात्र, दहीहंडीचा माहोल होता. कार्यकर्त्यांनी नृत्य करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे मी गौतमी पाटीलसोबत डान्स केला. टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे. - आमदार संदीप धुर्वे

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आहेत. आमदारांनी बांधावर जाऊन सांत्वन करण्याची गरज असताना हे नाचगाण्यात रममाण झाले. 
- संध्या सव्वालाखे
प्रदेश अध्यक्षा, महिला काँग्रेस आघाडी

Web Title: Chandi ki dal par..., BJP MLAs danced with Gautami Patil