वाठोडा शुक्लेश्वर येथील कोविड केअर सेंटरची सीईओंकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:13 IST2021-05-20T04:13:56+5:302021-05-20T04:13:56+5:30

वाठोडा येथे कोरोनाग्रस्तांची संख्या १९ झाली आहे. त्याअनुषंगाने सीईओ अविश्यांत पंडा यांनी गावात दाखल होऊन स्थितीचे अवलोकन केले. आरोग्य ...

CEO inspects Kovid Care Center at Vathoda Shukleshwar | वाठोडा शुक्लेश्वर येथील कोविड केअर सेंटरची सीईओंकडून पाहणी

वाठोडा शुक्लेश्वर येथील कोविड केअर सेंटरची सीईओंकडून पाहणी

वाठोडा येथे कोरोनाग्रस्तांची संख्या १९ झाली आहे. त्याअनुषंगाने सीईओ अविश्यांत पंडा यांनी गावात दाखल होऊन स्थितीचे अवलोकन केले. आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व महसूल प्रशासन यांच्या समन्वयातून गावपातळीवर कोविड केअर सेंटर उभारणीचे आदेश देण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर कोरोना जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश ग्रामपंचायत प्रशासनाला मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी दिले. सीईओ गावात दाखल होताच अकारण फिरणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला. मात्र, ही कारवाई सदोदित व्हावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली.

याप्रसंगी तलाठी पवार, सरपंच मोहम्मद रिजवान, वैद्यकीय अधिकारी रवींद्र ढाकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी अक्षय निकोसे, गटविकास अधिकारी मेश्राम, भातकुली विस्तार अधिकारी तेलंग, ग्रामपंचायत ग्रामसेवक लांडगे, आशा वर्कर, खोलापूरचे ठाणेदार संघरक्षक भगत यांची उपस्थिती होती.

Web Title: CEO inspects Kovid Care Center at Vathoda Shukleshwar