शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत मोबाईल चोरी गेल्यास टीसी दाखल करून घेणार गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 05:00 IST

धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशी लांबचा प्रवास करतात. किंबहुना, प्रवाशांकडील वस्तू अथवा मोबाइल चोरीला गेल्यास रेल्वेखाली उतरून पोलिसात तक्रार देणे शक्य होत नाही. त्यामुळे चोरीच्या घटनेची नोंद रेल्वे पोलिसात करण्यात येत नाही. तक्रार नाही तर तपास नाही, असा रेल्वे पोलिसांचा कारभार आहे. मात्र, आता रेल्वेत वस्तू, मोबाइल चोरीला गेल्यास प्रवाशांना पोलिसात जाऊन तक्रार न करता टीसींकडे याबाबत तक्रार करावी लागेल.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बरेचदा रेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटना झाल्यानंतरही याबाबत तक्रार दाखल होत नाही. विशेषत: मोबाईल चाेरीच्या घटना सातत्याने घडत असतानाही गुन्हे दाखल होत नाहीत. मात्र, आता नव्या नियमानुसार रेल्वेत मोबाइल चोरी गेला, तर टीसी गुन्हा दाखल करून घेणार आहे. प्रवाशांची तक्रार लिहून घेण्याची जबाबदारी टीसींकडे आली आहे.धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशी लांबचा प्रवास करतात. किंबहुना, प्रवाशांकडील वस्तू अथवा मोबाइल चोरीला गेल्यास रेल्वेखाली उतरून पोलिसात तक्रार देणे शक्य होत नाही. त्यामुळे चोरीच्या घटनेची नोंद रेल्वे पोलिसात करण्यात येत नाही. तक्रार नाही तर तपास नाही, असा रेल्वे पोलिसांचा कारभार आहे. मात्र, आता रेल्वेत वस्तू, मोबाइल चोरीला गेल्यास प्रवाशांना पोलिसात जाऊन तक्रार न करता टीसींकडे याबाबत तक्रार करावी लागेल. त्यानंतर चोरीच्या घटनेची तक्रार टीसी करणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे प्रवाशांच्या वेळ वाचणार आहे. तपासही जलद गतीने होणार आहे.

कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये दाखल करता येतो गुन्हारेल्वेत चोरी झाल्यास टीसीकडे असलेल्या अर्जाच्या आधारे प्रवाशांची माहिती घेण्यात येते. किंबहुना, चोरीची घटना घडल्यास टीसी रेल्वे पोलिसांशी संपर्क करतात. त्यानुसार, संबंधित डब्यात पोलीस पोहोचून स्वत: गुन्हा नोंदवून घेतात. त्यानंतर, प्रवाशांच्या व्हॉट्सॲप, ई-मेलवर एफआयआरची प्रत पाठविली जाते. आरपीएफ, जीआरपीही गुन्हा दाखल करू शकतात. प्रवासी ठरवेल त्या रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवू शकतो.- अजितसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक, बडनेरा रेल्वे.

- आता प्रवासी मर्जीनुसार कोणत्याही रेल्वे पोलिसात गुन्हा नोंदवू शकतात. तेथे झीरो गुन्हा दाखल करून, त्यानंतर ज्या भागात चोरी झाली, त्या रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची फाईल तपासासाठी पाठविली जाते.- चोरी झाल्यास धावत्या गाडीतच प्रवासी टीसीकडे तक्रार करू शकतात. त्यानंतर टीसी स्वत: प्रवाशांची तक्रार रेल्वे पोलिसात दाखल करू शकतात. त्यानंतर गुन्हा नोंदविल्याची प्रत प्रवाशांकडे पाठविण्याची व्यवस्था आहे. 

कोरोनाकाळात घटल्या चोरीच्या घटना कोरोनाकाळात रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण तिकिटांशिवाय प्रवास नाही, अशी नियमावली होती. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी ओसरली होती. कठोर नियमावलीमुळे ये-जा कमी झाल्याने चोरीच्या घटनाही घटल्या. बडनेरा रेल्वे स्थानकावरील पोलीस ठाण्यात सन २०१७ मध्ये २९८, सन २०१८ मध्ये ५८५, सन २०२० मध्ये १०४, तर सन २०२१ मध्ये आतापर्यंत ९० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हल्ली रेल्वेत जीआरपी, आरपीएफ जवानांची गस्त वाढल्याने चोरीच्या घटना मंदावल्या आहेत.

प्रवाशांचा वेळ वाचणार, तपासही जलद आता रेल्वे गाड्यात प्रवाशांचे वस्तू, मोबाईल चोरीला गेल्यास प्रवाशांना थेट पोलिसांत जाऊन गुन्हा नोंदविण्याची गरज नाही. चोरी झाल्याचे प्रवाशांनी टीसीला कळविल्यास तेच गुन्हा दाखल करून घेतील, अशी व्यवस्था आहे. रेल्वेत जीआरपी, आरपीएफही घटनास्थळी पोहोचून गुन्हा नोंदवतील, अशी नवीन व्यवस्था आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वेThiefचोर