शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

वाहकाने घालविली प्रवाशाची मिरगी!

By admin | Updated: November 17, 2016 00:19 IST

प्रवाशाला धावत्या बसमध्ये अचानक फिट (मिरगी ) येते आणि लगेच वाहकाने माणुसकीचे दर्शन दाखविले.

प्रसंगावधान : धावत्या बसमध्येच घडला प्रकारअमरावती : प्रवाशाला धावत्या बसमध्ये अचानक फिट (मिरगी ) येते आणि लगेच वाहकाने माणुसकीचे दर्शन दाखविले. क्षणात बस थांबविली. अन् त्या प्रवाशाची फिट जाईस्तोवर सेवा केल्याची घटना दर्यापूर - अमरावती बसमध्ये बुधवारी घडली. अमरावती येथे येण्यासाठी मुळचा तिवसा येथील युवक बसमध्ये चढला. मात्र म्हैसपूर नजिक अचानक त्याने डोळे पांढरे केले. त्याच्या तोंडावाटे फेसही बाहेर निघावयास प्रारंभ झाला. एका जागरुक प्रवाशाला हा प्रकार लक्षात येताच त्याने ही माहिती बडनेरा बसस्थानकात कार्यरत असलेल्या इसळ नामक वाहकाला दिली. आधी या युवकाला अचानक झटके येत असल्यामुळे बसमधील प्रवाशी काहीक्षण घाबरले. मात्र नंतर हा मिरगीचा रुग्ण असल्याचे लक्षात येताच बस थांबविण्यात आली. वाहकाने कशाचीही तमा न बाळगता त्याचे नाक दाबून फिट घालविण्याचा प्रयत्न केला. परंतु फिट जात नसल्याचे पाहून कांदा मागविण्यात आला. म्हैसपूर फाट्यानजीक हॉटेलमधून एका नागरिकाने जावून कांदा आणला. नंतर त्या प्रवाशाची मिरगी नाहीशी झाली. या प्रकाराने काही वेळ नागरिक घाबरुन गेले होते. दहा मिनिट बस थांबल्यानंतर ती पुढील प्रवासाला लागली. बस अमरावतीत पोहचताच मिरगी आलेला युवक सामान्य अवस्थेत आला. तो तिवसा येथील असून त्याचे आडनाव मोजे असल्याचे त्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वाहकाने पुढाकार घेऊन प्रसंगावधान ठेवून एका मिरगी रुग्णांचा जीव वाचविल्यामुळे प्रवाशांनी त्यांचे कौतूक केले आहे.