स्विमिंग टँकमध्ये पोहताना चक्कर येऊन बुडाल्याने व्यापाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 13:37 IST2023-07-05T13:36:23+5:302023-07-05T13:37:38+5:30

मुलगीही होती सोबत : प्रशिक्षकाला पाण्यात दिसला मृतदेह

Businessman dies due to vertigo while swimming in swimming tank | स्विमिंग टँकमध्ये पोहताना चक्कर येऊन बुडाल्याने व्यापाऱ्याचा मृत्यू

स्विमिंग टँकमध्ये पोहताना चक्कर येऊन बुडाल्याने व्यापाऱ्याचा मृत्यू

नागपूर : वर्धा मार्गावरील हॉटेल प्राइड येथील स्विमिंग टँकमध्ये पोहताना चक्कर आल्याने एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे हॉटेलमधील सुरक्षाप्रणालीवर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

सुशांत मधुसूदन धोपटे (५१, मेघरे ले आउट, मनीषनगर) असे मृताचे नाव आहे. ते मुलगा शौर्य (१२) व मुलगी शगुन (१७) यांच्यासह दोन महिन्यांपासून हॉटेल प्राइड येथील स्विमिंग टॅंकमध्ये पोहण्यासाठी जात होते. नेहमीप्रमाणे ते मंगळवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास पोहायला गेले. पोहत असताना सुशांत यांना चक्कर आली व ते पाण्यात बुडाले. ते बुडाल्याची बाब लक्षात येताच इतर लोकांनी त्यांना लगेच पाण्याबाहेर काढले व प्रथमोपचार करून धंतोलीतील एका खासगी इस्पितळात उपचारांसाठी नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे वडील मधुसूदन धोपटे यांच्या सूचनेवरून सोनेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Businessman dies due to vertigo while swimming in swimming tank