शिंगोरी येथे तीन घरे जाळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:47+5:302021-02-05T05:33:47+5:30

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील शिंगोरी येथील ज्ञानेश्वर अलोणे , पाडुरंग अलोणे, प्रल्हादराव अलोणे यांच्या घराला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. ...

Burn down three houses at Shingori | शिंगोरी येथे तीन घरे जाळून खाक

शिंगोरी येथे तीन घरे जाळून खाक

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील शिंगोरी येथील ज्ञानेश्वर अलोणे , पाडुरंग अलोणे, प्रल्हादराव अलोणे यांच्या घराला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. तिन्ही आगग्रस्त शेतकऱ्यांच्या घरात कापूस असल्याने आगीने वेगाने घराला विळखा घातला. बाजारात योग्य दर नसल्याने हा कापूस साठवून ठेवला होता . या १४० क्विंटल कापसासह घरातील अन्नधान्य, कपडे, घरातील कृषिसाहित्यासह संपूर्ण घर बेचिराख होऊन तिन्ही अलोणे कुटुंबे उघड्यावर आली आहेत. सुमारे दहा लाखांचा ऐवज जळाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच वरूड, शेंदूरजनाघाट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली . मात्र, तोपर्यंत सर्व काही बेचिराख झाले होते. बेनोड्याचे ठाणेदार मिलिंद सरकटेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला. आगीचे नेमके कारण काळू शकले नाही .

Web Title: Burn down three houses at Shingori