नागपुरीगेट हद्दीत घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:40+5:302021-04-16T04:13:40+5:30

अमरावती : नागपुरीगेट हद्दीत अज्ञात आरोपीने घरफोडी करून एका महिलेच्या घरातील १७ हजार तर दुसऱ्या महिलेच्या घरातील ...

Burglary at Nagpur Gate boundary | नागपुरीगेट हद्दीत घरफोडी

नागपुरीगेट हद्दीत घरफोडी

Next

अमरावती : नागपुरीगेट हद्दीत अज्ञात आरोपीने घरफोडी करून एका महिलेच्या घरातील १७ हजार तर दुसऱ्या महिलेच्या घरातील सोन्याच्या दागिन्यासह नगदी दोन हजार लंपास केले असता एकूण २३ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १२ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी पोलिसानी गुरुवारी गुन्हा नोंदविला. या प्रकरणी एका महिलेने तक्रार नोंदविली. पोलिसानी या प्रकरणी भादविची कलम ४५४,४५७,३८० अन्वये गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादी हे घराला कुलूप लावून लहान भावाकडे गेल्या असता, घराचा मागचा दरवाजा उघडा दिसला. त्यानी घरात जावून बघितले असता, कपाटातील १७ हजार चोरून नेल्याची निदर्शनास आले. फिर्यादीच्या घराला लागूनच असलेल्या त्यांच्या भावजयी च्या घरातही चोरट्याने हात साफ केला. त्यांच्या घरातून सोन्याच्या चांदीच्या दागिने चोरून नेले.

Web Title: Burglary at Nagpur Gate boundary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.