शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:14 IST

अमरावती : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगयांच्या संयुक्त विद्यमानेराष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त गुरुवार, ...

अमरावती : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगयांच्या संयुक्त विद्यमानेराष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त गुरुवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत ‘ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नवीन स्वरुप’ या विषयावर राज्यस्तरीय वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच ग्राहकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

0000

तालुकास्तरीय मासिक शिबिराचे आयोजन

अमरावती : प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे मोटार वाहन निरीक्षकांच्या उपस्थितीत जानेवारी ते जून महिन्यात तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कर स्वीकारणे, शिकाऊ उमेदवार अनुज्ञप्ती, वाहनाची अनुज्ञप्तीची चाचणी (जड वाहने वगळून), कंडक्टर लायसन्स चाचणी, नवीन वाहन नोंदणी इत्यादी कामे पूर्ण करण्यात येणार आहे. सदर शिबिरात संबंधित तालुक्यातील रहिवासी नागरिकांचीच कामे करण्यात येणार आहे. या शिबिराचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे.

0000

जिल्ह्यातील रेतीघाट लिलावाच्या ई-निविदा प्रक्रिया सुरू

अमरावती : सन २०२०-२१ या वर्षासाठी येत्या ९ जूनपर्यंत जिल्ह्यातील चार तालुक्यातील १५ रेती स्थळांच्या लिलावाची ई-निविदा-ई लिलाव ऑनलाईन प्रणालीव्दारे २२ डिसेंबरपासून करण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

00000

शहरात कलम ३७ (१) व (३) लागू

अमरावती : शहरात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी, यासाठी पोलीस उपायुक्त (अमरावती शहर) शशिकांत सातव यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. हे आदेश पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्रात २३ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत लागू राहील. या कलमांचा भंग करणाऱ्या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही शहर पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी कळविले आहे.