पशुसंवर्धन विभागात आज रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:13 IST2021-05-20T04:13:51+5:302021-05-20T04:13:51+5:30

----------- ११ वर्षीय मुलाच्या अपहरणाची तक्रार मंगरूळ दस्तगीर : नजीकच्या पेठ रघुनाथपूर येथील ११ वर्षीय मुलगा सोमवारी ट्यूशनला मंगरूळ ...

Blood donation today at the Animal Husbandry Department | पशुसंवर्धन विभागात आज रक्तदान

पशुसंवर्धन विभागात आज रक्तदान

-----------

११ वर्षीय मुलाच्या अपहरणाची तक्रार

मंगरूळ दस्तगीर : नजीकच्या पेठ रघुनाथपूर येथील ११ वर्षीय मुलगा सोमवारी ट्यूशनला मंगरूळ दस्तगीर येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाला. त्याच्या अपहरणाची तक्रार मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात मंगळवारी करण्यात आली.

----------------

सुरवाडी येथे महिलेला शिवीगाळ

तिवसा : तालुक्यातील सुरवाडी येथे संडासच्या पाईच्या मुद्द्यावरून २५ वर्षीय महिलेला भूषण ऊर्फ रोशन हरिभाऊ ठाकरे हा मारण्यासाठी धावला, तर दोन महिलांनी अश्लील शिवीगाळ केली. तिवसा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा भादंविचे कलम ३३६, ५०९, ५०४, ५०६, ३४ तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदविला.

---------

बेलोरा येथे दूध विक्रेत्या महिलेला मारहाण

तळेगाव दशासर : नजीकच्या बेलोरा येथे कोरोना असताना दूध कशाला वाटते, अशी विचारणा ग्राहक महिलेने दूध विक्रेतीला केली. यावरून वाद वाढत गेल्याने प्रवीण वसंतराव सोरते (४५) याने तिच्या डोक्यावर काठी मारली, तर त्याच्या पत्नीने थापडांनी मारहाण केली. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

--------------

Web Title: Blood donation today at the Animal Husbandry Department