शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बॉयोमेट्रिक मशिन बंद हजेरीपत्रकावर नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

ग्रामीण भागातील जनतेला जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर प्रशासकीय सेवा सुलभ व योग्य वेळेत मिळावी याकरिता शासन विविध उपाययोजना करीत आहे. शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळेत कार्यालयात पोहोचणे व कार्यालयीन कामकाम संपल्यानंतर घरी परतण्याची नोंद दैनंदिन केली जात आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला जाग येणार का? बंद यंत्रणा कधी होणार कार्यान्वित?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह सामान्य प्रशासन व अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची व जाण्याची वेळ नोंदविण्यासाठी मागील काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. परंतु ही बॉयोमेट्रिक यंत्रणा तीन महिन्यांपासून बंद आहे. परिणामी विविध विभागातील कर्मचारी आपली उपस्थिती हजेरीपत्रकांवर नोंदवित आहेत. त्यामुळे अनियमितता होत असून, ही बंद यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याची सवड केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.ग्रामीण भागातील जनतेला जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर प्रशासकीय सेवा सुलभ व योग्य वेळेत मिळावी याकरिता शासन विविध उपाययोजना करीत आहे. शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळेत कार्यालयात पोहोचणे व कार्यालयीन कामकाम संपल्यानंतर घरी परतण्याची नोंद दैनंदिन केली जात आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बहुतांश विभागात लाखो रुपये खर्चून बॉयोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली. परंतु सुरुवातीच्या काही महिन्यांचा अपवाद वगळता पुन्हा जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील ही यंत्रणा नादुरूस्त झाली. ती बायोमेट्रिक मशीन काढून दुरूस्तीला पाठविल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. परंतु अजूनही ती यंत्रणा कार्यान्वीत केल्या गेली नाही. परिणामी जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांतील यंत्रणा बंद असल्याने कर्मचारी नियोजित वेळत कार्यालयात येतात की नाही, हे अस्पष्ट असले तरी कर्मचारी हजेरी पत्रकावर येण्या जाण्याच्या नोंदी करीत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील बंद पडलेली बॉयोमेट्रिक यंत्रणा सुरू होणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे.मुख्यालयी राहणे बंधनकारकशासकीय कर्मचाऱ्याना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. झेडपीच्या अखत्यारितील विविध विभागांत कार्यरत बरेच कर्मचारी मुख्यालयी न राहता अपडाऊन करतात. त्यामुळे कार्यालयात दांडी मारली असली तरी दुसऱ्या दिवशी हजेरी नोंदवून काम भागवितात. त्यावर उपाययोजना म्हणून बॉयोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली. परंतु तीसुद्धा बंद पडलेली आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास