शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात बैलजोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 6:00 AM

मध्यंतरी पालकमंत्री पांदण विकास रस्ता योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. याकरिता ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले गेले. परंतु, त्यानंतर प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. परिणामी अमरावती तालुक्यात १५८ पांदण रस्त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. याबाबत सतत पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली गेली नाही.

ठळक मुद्देकृती समितीचे आंदोलन : पांदण रस्त्यावरून शेतकरी संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तालुक्यातील पांदण रस्ते मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने संप्तत शेतकऱ्यांना घेऊन सातबारा शेतकरी पांदण रस्ता कृती समितीने सोमवारी अमरावती उपविभागीय कार्यालयात धरणे दिले. शेतकऱ्यांनी एसडीओंच्या दालनात बैलजोडी आणली होती. या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली होती.यावर्षी प्रचंड पावसाने मातीच्या पांदण रस्त्यांवर गाळ झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकविलेला माल घरी आणता आला नाही. परिणामी त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. मध्यंतरी पालकमंत्री पांदण विकास रस्ता योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. याकरिता ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले गेले. परंतु, त्यानंतर प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. परिणामी अमरावती तालुक्यात १५८ पांदण रस्त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. याबाबत सतत पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली गेली नाही. याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील, रोहयो, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती या विभागांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप कृती समिती पदाधिकाऱ्यांनी केला. या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन समितीने केले. यादरम्यान आंदोलकांनी थेट उदयसिंह राजपूत यांच्या दालनात बैलजोडी आणून संताप व्यक्त केला. आंदोलकांशी तहसीलदार संतोष काकडे यांनी चर्चा केली. यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन निवळले. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे, बाळकृष्ण धर्माळे, राजेंद्र उमेकर, राजू लोखंडे, समीर जवंजाळ, राजेश उमेकर, मनीष धुर्वे, सचिन अढाऊ, वैभव डवरे, सूर्यभान पारिसे, भीमराव मेश्राम, रवींद्र उमेकर, विजय बाकेकर, रवींद्र समरित, प्रभाकर गुल्हाने यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.प्रशासनाची तारांबळसातबारा, शेतकरी पांदण रस्ता कृती समितीने पांदण रस्त्यामुळे शेतकºयांच्या हालअपेष्टा कशा होत आहेत, याचे वास्तव चित्र तहसीलदार काकडे यांच्यासमोर मांडले. यादरम्यान भेटीसाठी शिष्टमंडळ उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जात असताना सोबत बैलजोडी घेऊन थेट दालनात पोहोचले. परिणामी येथे उपस्थित तहसिलदारासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.

टॅग्स :Farmerशेतकरी