शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या बनावट आदेशांपासून सावध राहा

By admin | Updated: February 26, 2015 00:12 IST

काही समाज विघातक प्रवृत्तींनी आदिवासी विकास विभागाच्या नावाने शिक्षक पदासाठी बनावट नियुक्ती आदेश काढून सदर विभागाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.

अमरावती : काही समाज विघातक प्रवृत्तींनी आदिवासी विकास विभागाच्या नावाने शिक्षक पदासाठी बनावट नियुक्ती आदेश काढून सदर विभागाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. तसेच या प्रकरणी ज्यांचे नावे आदेश काढण्याचा प्रयत्न केला गेला त्यांची फसवणुकसुद्धा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आदिवासी विकास विभागाने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. याप्रकरणी मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता असू शकते, असे आदिवासी विकास विभागाचे मत आहे. तेव्हा अशा प्रकारच्या विघातक प्रवृत्तीला बळी पडू नये. तसेच बनावट आदेश प्राप्त होताच तत्काळ अपर आयुक्त, आदिवासी विकास यांच्या कार्यालयाशी किंवा पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी केले आहे. अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती या कार्यालयाने १२ फेब्रुवारी २०१४ व १७ फेब्रुवारी २०१४ अन्वये प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी/इंग्रजी), माध्यमिक शिक्षण सेवक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणसेवक, संशोधन सहायक, उपलेखापाल, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहायक, कनिष्ठ लिपिक, अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (स्त्री), लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री) या पदांच्या २१६ रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द केली. त्यापैकी शिक्षकेतर १५७ रिक्त जागांसाठी लेखी परीक्षा ५ जुलै २०१४ रोजी घेण्यात आली. सदर १५७ रिक्त जागांसाठी गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी झालेली आहे. कागदपत्रे तपासणीत पात्र शिक्षकेतर उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येत आहे. उर्वरित शिक्षक ४६ व शिक्षकेतर १३ रिक्त पदांची गुणवत्ता यादी तयार करण्याची कार्यवाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून सुरु आहे. गुणवत्ता यादी अद्याप अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या कार्यालयास प्राप्त झाली नाही. त्यामुळे शिक्षक पदाचे कोणतेही नियुक्ती आदेश संबंधित कार्यालयाकडून निर्गमित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, काही समाजविघातक प्रवृत्तींनी शिक्षक पदाचे बनावटी नियुक्ती आदेश काढून विभागाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. अशा बनावट आदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)