निराधारांना योजनेचा लाभ द्या

By Admin | Updated: September 11, 2016 00:18 IST2016-09-11T00:18:05+5:302016-09-11T00:18:05+5:30

श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना व अपंग योजनेद्वारा अपंगांना न्याय मिळावा, यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी धरणे दिले.

Benefit the planets to the destitute | निराधारांना योजनेचा लाभ द्या

निराधारांना योजनेचा लाभ द्या

विक्रम ठाकरे : न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही
वरूड : श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना व अपंग योजनेद्वारा अपंगांना न्याय मिळावा, यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी धरणे दिले. यावेळी शासनाला दाद मागण्याची तयारी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. जोपर्यंत वृद्धांना, अपंगाना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा वर्धा लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम ठाकरे यांनी दिला.
शहरातून महिला, वृद्ध, कार्यकत्यांनी तहसीलकार्यालयासमोर एकत्रित येऊन शासनविरूद्ध घोषणा दिल्यात. आंदोलनात माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांनी वृध्दांना मार्गदर्शन केले. यावेळी धनंजय बोकडे, प्रमोद टाकरखेडे, प्रदीप कांबळे, अनिल गुल्हाने, नीलेश बेलसरे, सुबोध कांडलकर, उल्लास लेकुरवाळे, अमोल बहुरूपी, नरेंद्र पावडे, दीपक देशमुख, प्रशांत भुजाडे, पांडुरंग घोरमाडे,राहुल चौधरी, अनिल आंडे, विजय चौधरी, अनिल कडू, शकील शहा, राहुल बोडखे, अजहर काजी, बंटी काजी, शम्मुभाई, निसारभाई, हरीश वरखेडकर, हर्षवर्धन लांडगे, हेमंत कोल्हे, उमेश रडके, अतुल खेरडे, जितेंद्र खडसे, देवेंद्र विधळे, लिलाधर डोईजोड, अनुप देशमुख, नीलेश अधव, मिलिंद वानखडे, गुलाब यावले, किशोर तडस, राहुल नागपुरेसह शेकडोे कार्यकर्ते सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Benefit the planets to the destitute