शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! लिंबू सरबतही घातक

By admin | Updated: April 2, 2017 00:12 IST

मार्च संपत नाही तोच पारा ४३ अशांपर्यंत पोहोचलाय. तापत्या उन्हात आपसुकच थंड पाणी आणि शीतपेयांची लालसा उत्पन्न होते.

उन्हाळ्यात होतो मोह : बर्फ मात्र धोकादायकच अमरावती : मार्च संपत नाही तोच पारा ४३ अशांपर्यंत पोहोचलाय. तापत्या उन्हात आपसुकच थंड पाणी आणि शीतपेयांची लालसा उत्पन्न होते. लिंबू सरबत, कोल्डड्रींक्स आणि इतर शितपेयांच्या गाड्यांकडे पावले वळतात. उन्हामुळे शुष्क झालेल्या घशात मग आपोआपच एका ऐवजी दोन ग्लास शितपेये ओतली जातात. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात आरोग्यदायी समजले जाणारे निंबू सरबत नागरिकांना खास आकर्षित करते. परंतु हे सरबत पित असताना आपण धोकादायक द्रव्य तर शरीरात ओतत नाही ना, याची खात्री करून घेण्याची गरज आहे. सरबत बनविताना दूषित पाण्याचा वापर केला असल्याने हे सरबत पिल्याने यामुळे टायफाईड व गॅस्ट्रोइंट्रायस्टिट सारखे आजार होऊ शकतात. लिंबूपाणी तयार करताना वापरण्यात येणारा बर्फ जर दूषित पाण्यापासून तयार केलेला असेल तर यामुळेही अनेक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे शितपेय, लिंबूपाणी रिचवताना सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचा सल्ला येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिली आहे. लिंबूमध्ये ‘सायट्रिक अ‍ॅसिड’ व व्हीटॅमीन ‘सी’ असल्यामुळे ते आरोग्याला अतिशय पोषक असते. त्यामुळे अन्नपचनास मदत होते. तसेच शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते. त्यामुळे लिंबूपाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी गरजेचे असते. कोल्डड्रींकपासून शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांवर बरेच मंथन आणि जनजागृती होत असल्याने सावध झालेल्या नागरिकांनी त्यांचा मोर्चा लिंबू सरबताच्या गाड्यांकडे वळविला आहे. कमी गुंतवणुकीत जादा फायदा मिळविण्यासाठी बरेच विक्रेते दूषित पाणी व निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा वापर करतात. यामुळे रोगराई झपाट्याने पसरू शकते. याहीपेक्षा घातक प्रकार म्हणजे काही ठिकाणी तर येथील श्वविच्छेदन केंद्रात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या लादीचा देखील सरबतासाठी मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याची चर्चा आहे.लिंबू पाण्यामधून मनुष्याला ‘व्हीटॅमिन सी’ मिळते. परंतु दूषित पाण्याचा वापर त्यामध्ये होत असेल तर टायफाईड, गॅस्ट्रोइंट्रायस्टिट सारखे अनेक आजार बळावू शकतात. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. - प्रवीण बिजवे, शल्यचिकित्सक अमरावती