शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! अतिरिक्त तूर उत्पादित केली तर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

जिल्ह्याकरिता हेक्टरी साडेपाच क्विंटल, नागपूरकरिता साडेबारा क्विंटल निकष, शेतकऱ्यांना जाच वरूड : राज्य शासनाने २०२०-२१ करिता किमान आधारभूत किंमत ...

जिल्ह्याकरिता हेक्टरी साडेपाच क्विंटल, नागपूरकरिता साडेबारा क्विंटल निकष, शेतकऱ्यांना जाच

वरूड : राज्य शासनाने २०२०-२१ करिता किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत सहकार, पणन व वस्त्रोउद्योग विभागाने शासकीय तूर खरेदीला मान्यता दिली आहे . मात्र, प्रतिशेतकरी प्रतिहेक्टर जिल्हानिहाय निकष वेगवेगळा आहे. अमरावती जिल्ह्याकरिता प्रतिहेक्टरी पाच क्विंटल, तर नागपूरकरिता १२ क्विंटल ४४ किलोचे प्रमाण दिले आहे. जिल्हानिहाय तफावतीचा तूर उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय का, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

राज्य शासनाने २०२०-२१ करिता किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने तूर खरेदीकरिता १८ डिसेंबर २०२० च्या पत्रान्वये मान्यता देण्यात आली. योजनेंतर्गत होणारी तूर खरेदी व्यवस्थित व सुरळीतपणे होण्यासाठी कृषी विभागाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार जिल्हानिहाय उत्पादकतेनुसार प्रतिशेतकरी तुरीची खरेदी करण्यात यावी, असा आदेश १४ जानेवारी २०२१ च्या पत्रानुसार आदेश सहकार, पणन व वस्त्रोउद्योग विभागाने शासकीय तूर खरेदीकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ (मुंबई), दि विदर्भ सहकारी पणन महासंघ (नागपूर) आणि महा एफसीपी (पुणे) यांना आदेश दिले. यामध्ये उत्पादकतेनुसार जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी तूर खरेदीचे निकष लावले आहेत. त्यानुसार, ठाणे ५ क्विंटल ४८ किलो, पालघर ४ क्विंटल ४४ किलो, रायगड ५ क्विंटल ८६ किलो, रत्नागिरी ४ क्विंटल १५ किलो ८० ग्रॅम, सिंधुदुर्ग ४ क्विंटल, नाशिक १२ क्विंटल ९६ किलो २५ ग्रॅम, धुळे ५ क्विंटल ५० किलो, नंदुरबार ५ क्विंटल ५० किलो, जळगाव १२ क्विंटल ३४ किलो, अहमदनगर ९ क्विंटल ५० किलो, पुणे ६ क्विंटल २० किलो, सोलापूर ८ क्विंटल ८९ किलो, सातारा १२ क्विंटल, सांगली ७ क्विंटल ३२ किलो, कोल्हापूर १० क्विंटल ७५ किलो, औरंगाबाद ८ क्विंटल ११ किलो, जालना २० क्विंटल, बीड १५ क्विंटल ७५ किलो, लातूर ६ क्विंटल २० किलो, उस्मानाबाद ६ क्विंटल ८० किलो, नांदेड ८ क्विंटल ५० किलो, परभणी ६ क्विंटल ५० किलो, हिंगोली ८ क्विंटल १५ किलो, बुलढाणा ९ क्विंटल २७ किलो २३ ग्रॅम, अकोला १२ क्विंटल, वाशिम ७ क्विंटल ५० किलो, अमरावती ५ क्विंटल, यवतमाळ ९ क्विंटल, वर्धा ९ क्विंटल आणि नागपूर १२ क्विंटल ४४ किलो असे ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यासाठी जिल्हानिहाय हेक्टरी प्रमाण देऊन शासकीय तूर खरेदीचे आदेश देण्यात आले आहे. परंतु, यामुळे या निकषापेक्षा अधिक तूर व्यापाऱ्यांच्या घशात जाईल, तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार हे निश्चित आहे.

दरम्यान, अमरावती वर्धा, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात तुरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. हेक्टरी उत्पादन २० ते ४० क्विंटल असते. परंतु, निकषांनी तूर उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी होणार आहे.