शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! बोगस बियाणे बाजारात

By admin | Updated: March 15, 2015 00:39 IST

शेती संबंधित सर्व घटकांमध्ये बियाणे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. सोयाबीनने सलग तीन वर्षे निराश केल्यामुळे यंदा कपाशीच्या किमान ५० हजार हेक्टर...

गजानन मोहोड अमरावतीशेती संबंधित सर्व घटकांमध्ये बियाणे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. सोयाबीनने सलग तीन वर्षे निराश केल्यामुळे यंदा कपाशीच्या किमान ५० हजार हेक्टर क्षेत्रात वाढ होण्याची चिन्हे आहेत. खरिपाचा हंगाम तोंडावर असताना बाजारात बोगस बियाण्यांचा शिरकाव झाला असून शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. शेतकरी बाजारातील उपलब्धतेनुसार वाणाची निवड करतात. यामध्ये त्यांची फसगत होते. अलिकडे बाजारात राऊंडअप विडगार्ड, तनावरची बिटी आदी बोगस बियाण्यांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी सावध राहण्याचा सल्ला कृषी विभागाद्वारे दिला जात आहे. खरिपाच्या गेल्या हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा शिरकाव झाला होता. यावर्षी देखील हा प्रकार घडण्याची शक्यता आहे. टॅग, लेबल पाहूनच करावी खरेदी बियाण्यांच्या पिशवीवरील टॅग बघूनच बियाणे खरेदी करावे. या टॅगवरील लॉट नंबरवरुन त्या बियाण्यांची निर्मिती करणारे राज्य व बियाणे निर्मितीची तारीख कळते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळता येते. लेबल नसलेले बियाण्यांचे पाकीट खरेदी केल्यास फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बियाणे खरेदी करताना ही घ्यावी काळजीअधिकृत परवानाधारक दुकानदारांकडून कपाशी बियाण्यांची खरेदी करावी. बियाणे खरेदी केल्यावर त्याचे पक्के बिल न चुकता घ्यावे.कपाशी बियाण्यांच्या पाकिटावरील सरकारमान्य चिन्ह तपासून घ्यावे.बोलगार्ड-१ मध्ये उपलब्ध वाण ८३० रुपये व बोलगार्ड-२ मधील वाणांची ९३० रुपये या शासनमान्य दरानेच खरेदी करावी. सरकारमान्य बोलगार्डचे चिन्ह व बोलगार्ड २ चिन्हासोबत दोन उभ्या गुलाबी रेषा तपासून घ्याव्यात.दुकानदार पक्की पावती देत नसल्यास १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.