ट्रकमधील बॅटरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:13 IST2021-01-25T04:13:56+5:302021-01-25T04:13:56+5:30

अमरावती : उभ्या ट्रकमधील सात हजार रुपये किमतीची बॅटरी अज्ञाताने चोरून नेल्याची घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीतील अळणगाव येथे १९ ...

Battery theft from truck | ट्रकमधील बॅटरी चोरी

ट्रकमधील बॅटरी चोरी

अमरावती : उभ्या ट्रकमधील सात हजार रुपये किमतीची बॅटरी अज्ञाताने चोरून नेल्याची घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीतील अळणगाव येथे १९ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून नीलेश दिलीप बाभूळकर (२०), अंकुश संजय नवले (२९, दोन्हा रा. अळणगाव) व खारतळेगावातील अन्य चाैघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. याप्रकरणी फिर्यादी धीरज संजय दुर्गे (२५, रा. अळणगाव) यांनी पोलिसांत तक्रार दिली.

---------------------------------------------------------

मेहेरबाबा कॉलनीतून बॅटरी लंपास

अमरावती : राजापेठ ठाण्याच्या हद्दीत उभा केलेल्या ट्रक (एमएच२९ एमओ ७३९) मधून ६,४०० रुपये किमतीची बॅटरी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना २१ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. संदीप वामनराव नेवारे (४०, रा. जुनी वस्ती, बडनेरा) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.

-----------------------------------------------------------

इसामाच्या हातावर चाकूने मारून जखमी

अमरावती : जुन्या वादाच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकाच्या हातावर चाकूने मारून जखमी केल्याची घटना पठाण चौकातील उर्दू असोसिएशन शाळा येथे शुक्रवारी घडली. फारूख (रा. हैदरपुरा) व अन्य अनोळखी इसमाविरुद्ध जखमी व फिर्यादी अब्दुल जब्बार अब्दुल रफीक (४३, रा. पाटीपुरा ) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Battery theft from truck