बच्चू कडूंची न्यायालयात पेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:15 AM2021-09-24T04:15:23+5:302021-09-24T04:15:23+5:30

अमरावती : अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांची बुधवारी न्यायालयात पेशी झाली. जिल्हा सत्र न्यायालयाने ना. बच्चू ...

Bachchu Kadu's cells in court | बच्चू कडूंची न्यायालयात पेशी

बच्चू कडूंची न्यायालयात पेशी

Next

अमरावती : अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांची बुधवारी न्यायालयात पेशी झाली. जिल्हा सत्र न्यायालयाने ना. बच्चू कडू यांची जमानात नियमित केली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ५ एप्रिल २००५ रोजीच्या अमरावती दौऱ्यात आमदार बच्चू कडू व त्याच्या सहकाऱ्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यासमोर मडके घेऊन त्यांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेत असताना बच्चू कडू यांनी बैठकीत घुसून गोेंधळ घातला पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बच्चू कडू यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. यावेळी धक्कबुक्की झाली होती. तेव्हा पोलिसांनी बच्चू कडूंसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केला आणि तपास पूर्ण करून दोषारोपपत्र लोअर कोर्टात दाखल केले. त्यावेळी लोअर कोर्टाने बच्चू कडू यांना जामीन दिला होता.

प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात आल्यामुळे बुधवारी दुपारी ना. बच्चू कडू यांना हजर राहावे लागले. न्यायालयाने त्यांचा जामीन नियमित केली. यावेळी वकील अनिल विश्वकर्मा, अनिरुद्ध लड्ढा, श्रीकांत गोहळ यांनी ना. कडू यांच्याकरिता युक्तिवाद केला.

यासंदर्भात ना. बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.

Web Title: Bachchu Kadu's cells in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.